एक्स्प्लोर

Skin Care Tips:मेकअप करताना घ्या ही काळजी; अन्यथा त्वचेवर होईल वाईट परिणाम

Skin Care Tips: ब्युटी प्रोडक्ट चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवल्याने काय नुकसान होऊ शकते?  मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी? याबद्दल जाणून घेऊयात...

Skin Care Tips: अनेक लोक मेकअप (Makeup) करताना विविध प्रकारची क्रिम, पावडर, आयलायनर, लिपस्टिकचा वापरतात. काही लोक रोज मेकअप करतात. मेकअप करताना वापरण्यात आलेल्या प्रोडक्ट्सचा तुमच्या चेहऱ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. ब्युटी प्रोडक्ट चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवल्याने काय नुकसान होऊ शकते?  मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी? याबद्दल जाणून घेऊयात...

लिपस्टिक (Lipstick) हे प्रत्येक मुलीचे आवडते मेकअप प्रोडक्ट आहे. पण अनेक वेळा पैसे वाचवण्यासाठी महिला स्वस्त लिपस्टिक खरेदी करतात.  ही लिपस्टिक लावल्याने तुमचे ओठ काळे होतात. तसेच ओठ कोरडे देखील पडतात. त्यामुळे मेकअप करताना नेहमी ब्रँडेड लिपस्टिक लावावी.

कन्सीलरचा (Concealer) जास्त वापर टाळा:  त्वचेवरील डाग लपवण्यासाठी महिला या बर्‍याचदा मेकअप करताना कन्सीलरचा वापर करतात. कन्सीलरचा जास्त वापर केल्याने तुमची त्वचा खराब होऊ शकते. यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात. त्यामुळे मेकअप करताना कन्सीलरचा जास्त वापर करु नये. 

मेकअप जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवू नका:  अनेकांना रोज मेकअप करण्याची सवय असते. घरी आल्यावर रोज मेकअप रिमूव्हरनं मेकअप काढावा. जर तुम्ही चेहऱ्यावर तसाच मेकअप ठेवून झोपलात तर तुमची त्वचा खराब होईल. चेहऱ्यावर मेकअप बराच वेळ ठेवल्यानं त्वचेची छिद्रे बंद होतात, त्यामुळे तुम्हाला मुरुमांचा त्रास होऊ शकतो.

जास्त प्रमाणात स्पा घेतल्याने त्वचेचे नुकसानही होऊ शकते. सतत स्पा केल्यानं त्वचेची नॅचरल ग्लो निघून जातो. तसेच चेहऱ्यावर पिंपल्स देखील येऊ शकतात. 

पिंपल्स फोडू नका:  पिंपल्स फोडल्यानं बॅक्टेरिया आणि घाण त्वचेच्या छिद्रांमध्ये जातात, ज्यामुळे त्वचेवर कायमचे डाग पडतात. 

मेकअप करण्याआधी आणि मेकअप केल्यानंतर चेहरा थंड पाण्यानं धुवा. तुम्ही चेहऱ्याला मुलतानी मातीचा किंवा हळदीचा फेसपॅक लावू शकता.  मुलतानी माती गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला फेस पॅक म्हणून लावू शकता. या पॅकमुळे तुमच्या स्किनवर ग्लो येतो आणि चेहऱ्यचा तेलकटपणा देखील कमी होतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Skin Care Tips : त्वचेवरील काळपटपणा घालवण्यासाठी घरच्या घरी करा फेस पॅक; झटपट पडेल फरक

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

World Pneumonia Day 2026 : हवेतील प्रदूषणामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो : तज्ज्ञांचा इशारा
हवेतील प्रदूषणामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो : तज्ज्ञांचा इशारा
MahaLab Issue Bhandara: महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत 'महालॅब' रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल
महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत 'महालॅब' रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल
Daily Walking Target : दररोज 10,000 पावले चालणे खरोखरच गरजेचे आहे का? वयानुसार आणि फिटनेसनुसार किती चाललं पाहिजे? जाणून घ्या योग्य प्रमाण
दररोज 10,000 पावले चालणे खरोखरच गरजेचे आहे का? वयानुसार आणि फिटनेसनुसार किती चाललं पाहिजे? जाणून घ्या योग्य प्रमाण
Health News: दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget