Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे मात्र हा अर्थसंकल्प अजित पवारांच्या शिवाय मांडला जाणार आहे खरं तर अर्थसंकल्पावरती अजित पवारांनी सुद्धा तयारी केलेली होती आपल्या सोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आहेत सर खरं तर आज अर्थसंकल्प मांडला जाणार आहे मात्र हा अर्थसंकल्प अजित पवारांच्या शिवाय मांडला जातोय कसं वाटतंय? खरं तर अत्यंत वेदनादायक क्षण म्हणावा लागेल कारण बाराव्यांदा अजित दादा अर्थसंकल्प मांडणार होते तशी तयारी पण त्यांनी केली होती आणि तेरा च रेकॉर्ड जे आहे बॅरिस्टर वानखडे साहेबांचं ते आता दोन अर्थसंकल्पात तुटणार होतं आणि राज्याचा विक्रम अजित दादांच्या नावे नोंदवला गेला असता अत्यंत सोप्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून कुठलेही त्यामध्ये धार्मिक ध्रुवीकरण न करता सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न अजित दादांचा या अर्थसंकल्पातून असायचा मला स्पष्ट आठवतं मी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा अजित दादांना भेटलो हिवाळी अधिवेशनात त्यांना म्हटलं मला भेटायचं आहे तर म्हणत आता अर्थसंकल्पाची गडबड आहे त्यामुळं सध्या एक दीड महिना तरी काही भेटू आपण भेट टाळा एक दीड महिना म्हणजे इतकी तयारी त्या माणसाने डिसेंबर पासूनच केली होती ठीक आहे आज देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तो अर्थसंकल्प मांडतायत पण अजित दादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य होणारी आहे म्हणजे त्या अर्थसंकल्पाला सुद्धा काही अर्थ आहे की नाही असं वाटायला लागलंय शेवटी काळाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही पण दादांचा आज या सभागृहात अर्थसंकल्प मांडायला नसणं मला असं वाटतं याच्या पेक्षा वाईट क्षण महाराष्ट्रासाठी दुसरा कोणता असू शकत नाही. अर्थसंकल्प मांडताना त्या आठवणी सगळ्या येतील समोर अर्थातच येतील दादांचं एक हे होतं तुकारामाच्या अभंगाने सुरुवात व्हायची एखादा सुरेश भटांची गजल चे दोन ओळी असायच्या मागच्या अधिवेशनातला तुम्ही अर्थसंकल्प ऐकत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा दादांनी मी कामाचाच माणूस आहे हे दादांचे शब्द अर्थसंकल्पाला ज्या वेळेस चर्चा येते अर्थसंकल्प नंतर सभागृहामध्ये विरोधकांचे मुद्दे मिश्कीलपणे खोडून काढणारे दादा किंवा मलाच नाही तुम्हाला पण सर्व पत्रकारांना आज आठवण येईल अर्थसंकल्प मांडल्यानंतर जेव्हा पत्रकारांसमोर दादा यायचे इथे हसत खेळत सगळा अर्थसंकल्प मांडत आज तुम्ही पण दादाला मिस करणार अक्खा महाराष्ट्र मिस करतोय त्याच्यामुळे आजचा दिवस जसा 28 जानेवारी आमच्या सर्वांच्या जीवनातला काळा दिवस ठरला तसा आज राज्याचा अर्थसंकल्प जरी असेल पण दादा नावाचा बाप माणूस अर्थसंकल्प मांडायला नाही मला असं वाटतं त्याच्यापेक्षा काही नाही आणि काय तिथं सभागृहात खालच्या सभागृहात आम्ही ऐकत होतो आणि वरच्या सभागृहात आशिष जयस्वाल यांनी मागच्या वेळेस मांडला होता पण आम्ही जरी अर्थसंकल्प वरच्या सभागृहात ऐकत होतो पण त्या आमच्या मॉनिटर वर आम्ही दादा काय अर्थसंकल्प मांडतात विधानसभेचा अर्थसंकल्प ऐकत होतो कारण दादाचं ते बोलण्याची पद्धत असं की तुकारामाचा अभंग पण त्या स्टाईलमध्ये ती आता महाराष्ट्र मिस करेल आणि कायमचं एक मोठं नेतृत्व गमावल्यामुळे अर्थसंकल्पाचा खणखणीत आवाज परत या विधान भवनात घुमणार नाही. खरं तर दादा अर्थसंकल्प मांडायला त्यांना गेटवरनं यायचे इथं सगळे तुम्ही आमदार जायचे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पार्पण करायचे आणि मग दादा आतमध्ये पायऱ्यांवरती सगळं तर आज सगळं हे मिस करताय तुम्ही? अर्थातच मी जितक्या वेळेस अर्थसंकल्पाला दादा सोबत होतो मी एकच दिवस जॅकेट घालत होतो त्याचं कारण असं होतं की दादांचा अर्थ अर्थमंत्री म्हणून ज्या वेळेस ते अर्थसंकल्प मांडायचे त्यावेळेस त्यांचा पेहराव वेगळा असत होता ब्रीफकेस इथं पायऱ्यांवर येणं आमचे नारे लावणं आणि त्यांना घेऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करायला जाताना त्या पुतळ्याची सुद्धा दादा इतकी काळजी तिथे घेत होते की हार पुतळा स्वच्छ धुतलेला आहे की नाही पाहायचे काही तिथे डाग पडलेला आहे का हे पाहायचे आणि त्यानंतर आम्ही एकच वादा अजित दादा महाराष्ट्राचा वादा आणि त्या पद्धतीने मागच्याच वेळेस मला वाटतं गुलाबी जॅकेट त्यांनी घातलं होतं अर्थसंकल्पाच्या वेळेस पण दादाचा तो रुबाब नाही दिसणार आणि इथंच यायचे होते ना गेटवर घ्यायला दादा सकाळी आले म्हणजे चला सर्व आमदार दादा येतात दादा येतात दादा येतात आज सुने सुने हे मधुबन सारे आणि नंदनंदन हा तुझ्याविना रे सुनं सुनं वाटतंय सगळं वाईट वाटतंय की दादा नसणं मी भावुक झालो. प्रत्येक क्षणात आठवणी येतात दादाच्या आमच्यासारख्याला काय अर्थसंकल्प कळतो दादा मला सांगा ना अर्थसंकल्प आमच्या जीवनात त्या अर्थसंकल्पाला सोप्या पद्धतीने सांगणारा नेता म्हणजे दादा होते आम्हाला विचारात होते आर्थिक पाहणी अहवाल पाहिला का? पाहिला असेल तर त्यातून काय समजलं नाही तर देवेंद्रजींनी साधारण साधं पुस्तक लिहिलं एकदम सोप्या भाषेत अर्थसंकल्प वाचलं का ग्रीन बुक कशाला म्हणतात पिंक बुक कशाला म्हणतात हे सुद्धा दादा सांगत आणि सोपं नव्हतं साहेब 12 12 वेळ अर्थसंकल्प राज्याचा सादर करणं आज रेकॉर्ड होता होता दादा चालले गेलेत काही वाईट वाटणार आहे आज दादा नाहीत तर त्या गेटवर आम्ही पाहतोय वेड्यासारखी वाट रोज दादा येतील विचारतील कोण कोण आलंय सगळेजण वेलवर असतात इथे पायऱ्यांवर वेड्यासारखी वाट बघायची हे काय सगळे आमदार वेड्यासारखी वाट बघतात त्यांची त्याच्यामुळे दादाचं नसणं हे असह्य आहे हे आजच्या दिवसाला पाहतोय दादांचं नसणं हे असह्य आजच्या दिवसाला आज अर्थसंकल्प मांडला जातील मात्र दादांचा तो रुबाब तो कणखरपणा ते गुलाबी कलरचं जॅकेट जे आहे ते मात्र दादांचं दिसणार नाही अशा भावना ज्या आहेत त्या अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलेल्या पाहायला मिळतायत.
महत्त्वाच्या बातम्या





















