Skin Care Tips : त्वचेवरील काळपटपणा घालवण्यासाठी घरच्या घरी करा फेस पॅक; झटपट पडेल फरक
उन्हामुळे चेहऱ्यावरील त्वचा ही काळी पडते. अनेक ब्यूटी प्रोडक्ट वापरल्यानंतर ही अनेकांच्या चेहऱ्यावरील टॅन जात नाही.
How to Remove Skin Tanning : उन्हामुळे चेहऱ्यावरील त्वचा ही काळी पडते. अनेक ब्यूटी प्रोडक्ट वापरल्यानंतर ही अनेकांच्या चेहऱ्यावरील टॅन जात नाही. जर तुम्हाला घरीच टॅन घालवायचा असेल तर हे उपाय नक्की ट्राय करा-
टोमॅटो- टॉमॅटो मिक्सरमध्ये मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. हा टोमॅटोच्या पेस्टचा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. 15 मिनीटांनंतर चेहरा धुवा. आठवड्यातून दोन वेळा टोमॅटो चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील काळपटपणा कमी होतो. तसेच चेहऱ्यावर ग्लो देखील येतो.
बेसन- एका बाऊलमध्ये बसन घ्या. त्यामध्ये थोडी हळद, एक चमचा ओलिव्ह ऑयल आणि लिंबाचा रस टाका. हे सर्व निट मिक्स करून चेहऱ्याला लावा, 15 मिनीटांनंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धूवा. यामुळे चेहऱ्यावरील टॅन निघून जातो.
मध- मधामध्ये दही मिक्स करून फेस पॅक तयार करा. हा पॅक आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावण्याने चेहऱ्यावर ग्लो येतो.
मुलतानी मातीचा फेसपॅक- मुलतानी माती गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला फेस पॅक म्हणून लावू शकता. या पॅकमुळे तुमच्या स्किनवर ग्लो येतो आणि चेहऱ्यचा तेलकटपणा देखील कमी होतो.
तसेच चेहऱ्यावर हळद आणि गुलाब पाणी मिक्स करून लावल्याने देखील चेहऱ्यावर ग्लो येतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :