एक्स्प्लोर

Skin Care : उन्हाळ्यात फिरताय पण सावधान! प्रवासात त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोग तज्ज्ञ सांगतात...

Skin Care : उन्हाळ्यात बाहेर जाण्यापूर्वी एक चांगले स्किनकेअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे.  प्रवासात त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोग तज्ज्ञ सांगतात...

Summer Skin Care : उन्हाळ्याच्या सुट्टीला सुरुवात झाली आहे. या सुट्टीचा आनंद लूटण्यासाठी बरेचजण ठिकठिकाणी प्रवास करतात, नवीन ठिकाणी भेट देतात. पण, फिरायला जाण्यापूर्वी तुमच्या त्वचेची चांगली काळजी घेणे ही गरजेचे आहे. सुट्टीवर जाण्यापूर्वी त्वचेची काळजी कशी घ्याल आणि उपचार कसे कराल? याविषयीची माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन, द एस्थेटिक क्लिनिक्स, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट (त्वचारोग तज्ज्ञ) डॉ. रिंकी कपूर याबाबत माहिती देत आहेत.

बाहेर जाण्यापूर्वी एक चांगले स्किनकेअर रुटीन फॉलो करा

प्रवासापूर्वी आपल्या त्वचेची काळजी घेतल्यास आपली त्वचा निरोगी आणि नितळ राहते. प्रवासामुळे तुमची त्वचा वेगवेगळ्या हवामान, वातावरण आणि प्रदूषकांच्या संपर्कात येते, ज्यामुळे कोरडेपणा, त्वचा कोरडी पडणे, मुरुम, फोड आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात. तुम्ही बाहेर जाण्यापूर्वी एक चांगले स्किनकेअर रुटीन फॉलो करायला विसरु नका, तुम्ही तुमच्या त्वचेला या आव्हानांसाठी तयार करण्यात आणि तिचे नैसर्गिक संतुलन राखण्यात मदत करू शकता. कसे ते जाणून घ्या...

त्वचेची योग्य काळजी घ्या...

प्रवासापूर्वी त्वचेची योग्य काळजी घेतल्यास त्वचा चांगली राखण्यास मदत होते. उन्हामुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते, ज्यामुळे लालसरपणा, खाज आणि मुरुमांचा त्रास होऊ शकतो. प्रवासापूर्वी स्किनकेअरमध्ये रुटीन फॅालो केल्याने तसेच चांगल्या दर्जाच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर केल्यास त्वचा निरोगी आणि तजेलदार राखण्यास मदत होते.

काही खास टिप्स

· उत्तम स्कीन केअर रुटीने हे  तुमच्या त्वचेसाठी योग्य ठरते तसेच योग्य पध्दतीने सीरम, मॉइश्चरायझर्स किंवा सनस्क्रीनचा वापर केल्यास ते अधिक प्रभावीपणे त्वचेमध्ये खोलवर जाऊन संरक्षण करते.

· प्रवासाला जाण्यापूर्वी तुमची त्वचा निरोगी आणि तजेलदार राहील याची खात्री करा आणि योग्य ती काळजी घ्या.

· तुमची त्वचा हायड्रेट राखण्यासाठी आणि कोरड्या हवेपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या स्किनकेअरमध्ये हायड्रेटिंग सीरम आणि मॉइश्चरायझर्सचा वापर करा.

· सनस्क्रीन वापरायला विसरू नका. कारण सुर्याची अतिनील किरण त्वचेस हानीकारक ठरु शकतात. केवळ डॉक्टरांनी शिफारस केलेले सनस्क्रीन वापरा आणि त्वचेला सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवा.

· एक्सफोलिएशन ही प्री-ट्रॅव्हल स्किनकेअरमधील आणखी एक महत्त्वाची पायरी आहे. कारण ती मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते आणि तुमची उत्पादनं त्वचेत खोलवर जाण्यास मदत करते. नितळ, तेजस्वी त्वचेसाठी सौम्य एक्सफोलिएटिंग स्क्रब आणि उत्पादनांची निवड करा.

· भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड राहा आणि बाहेरून हायड्रेटिंग फेस मास्क किंवा मिस्ट्स वापरून लांबचा विमान प्रवास किंवा कार राईड करा. यामुळे तुम्ही जेव्हा तुमच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचाल तेव्हा तुमची त्वचा तजेलदार आणि टवटवीत दिसेल.

या स्किनकेअर उपचारांची निवड करा

-तुमच्या सुट्टीपूर्वी स्किनकेअर उपचारांपैकी सर्वात चांगला पर्याय म्हणजे हायड्रेटिंग फेशियल. हे तुमच्या त्वचेचे पोषण आणि मॉइश्चरायझेशन राखण्यास मदत करते ज्यामुळे तुमची त्वचा ताजी आणि टवटवीत वाटेल.

-दुसरा पर्याय म्हणजे अनेकांनी निवडलेली केमिकल पिल्स, जी त्वचेच्या बाहेरील थराला एक्सफोलिएट करून  त्वचा नितळ व त्वचेचा रंग उजळविण्यास मदत करते.

-मायक्रोडर्माब्रेशन हे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास आणि त्वचेवरील छिद्रे बंद करण्यात मदत करू शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सहलीसाठी अधिक तेजस्वी त्वचा अनुभवायला मिळेल. या प्रक्रियेसाठी प्रशिक्षित तज्ञाची निवड करायला विसरु नका.

-सुट्टीवर जाण्याआधी डर्मप्लॅनिंग उपचार घ्या. ही प्रक्रिया तुमच्या त्वचेच्या पृष्ठभागावरून मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते. यामुळे तुमचे सौंदर्य आणखी खुलुन येईल. कुटुंबासह किंवा मित्रांसोबत सहलीला जाण्यापूर्वी मुरुम किंवा हायपरपिग्मेंटेशन यासारख्या विशिष्ट स्किनकेअर समस्यांना लक्ष्य करण्यासाठी लाइट थेरपी करायला विसरु नका. या प्रभावी उपचारांमुळे तुमची त्वचा तजेलदार आणि निरोगी दिसेल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा>>>

Health : 'या' प्रमुख कारणामुळे 30-40 वयोगटातील 80 टक्के जोडप्यांना गर्भधारणा होईना! तज्ज्ञांनी दिला 'हा' इशारा

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Kardile : महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Solapurkar : शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल सोलापूरकरांनी मागितली माफीVarsha Bungalow : रेड्यांची शिंगं, येड्यांचा बाजार; वर्षा बंगल्यामध्ये काय परलंय? Special ReportNarayangad VS Bhagwangad : बीड प्रकरणी गडाच्या परंपरेला वादाचं आख्यान? Rajkiya Sholay Special ReportRahul Solapurkar : प्रसिद्धीसाठी राहुल सोलापूरकर बरळले? नेमकं काय बोलले? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Kardile : महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
Embed widget