ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. कृषिमंत्र्यांनी डीबीटी ट्रान्सफरच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर काढलं, धनंजय मुंडेंच्या खात्याकडून दुप्पट दराने खरेदी; 88 कोटींच्या भ्रष्टाचाराचा अंजली दमानियांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/y6p7nsfa आता सरकारने अंजली दमानियांना विचारुन खरेदीच्या किंमती ठरवायच्या का? धनंजय मुंडे आरोपांवरुन संतापले, म्हणाले दमानियांच्या बुद्धीची कीव करावीसी वाटते https://tinyurl.com/5jymwtb2
2. राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुण्यात जलसंपदा अन् साताऱ्यात जलसंधारण प्रकल्पाचा जिल्ह्याला थेट लाभ, महसूलसंदर्भातील अभय योजनेसही मुदतवाढ https://tinyurl.com/2rhvut22
3. मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं, 10 टक्के खर्च आरोग्यावर, आयुक्त भूषण गगराणींनी दिली माहिती https://tinyurl.com/37hermte महापालिकेच्या ठेवी मोडल्या हा आरोप चुकीचा, आजही 82,800 कोटींची ठेव, मुंबईला लुटणाऱ्यांना आरसा दाखवला, एकनाथ शिंदेंचा टोला https://tinyurl.com/yck5622t
4. युवासेनेचे नेते सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर, कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरेंचा शिलेदार वर्षभराने जेलबाहेर! https://tinyurl.com/24pfn8yk डरपोक गद्दार पळून गेले, पण माझा भाऊ वाघासारखा लढला; सूरज चव्हाणांना जामीन मिळताच आदित्य ठाकरेंचं ट्विट https://tinyurl.com/3ajwnajc
5. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार लाडकी बहीण योजनेची पडताळणी; घरात 'चारचाकी' दिसली तर थेट लाभ होणार रद्द https://tinyurl.com/yh4pt354 लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊ द्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला https://tinyurl.com/yv9praur अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; महिला व बालकल्याण विभागाकडे केला अर्ज, आता बँकेत पैसे येणार नाहीत https://tinyurl.com/2kpx3be3
6. आधी म्हणाले, पंचांना गोळ्या घाला, आता डबल महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा 2 दिवसांत परत करणार, चंद्रहार पाटील यांचा मोठा निर्णय https://tinyurl.com/kedmyv2x शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली 'महाराष्ट्र केसरी' पुन्हा भरवा; आमदार रोहित पवार म्हणाले, कर्जत जामखेडमध्ये पैलवानांना लढवा https://tinyurl.com/yjyjxdzd
7. संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्याने नामदेव शास्त्री महाराजांचे पुण्यातील कीर्तन रद्द, मराठा समाजाच्या विरोधानंतर संस्थानचा निर्णय https://tinyurl.com/bdez5mcx नामदेव शास्त्रींचा पाठिंबा मिळाला आता नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगला, धनंजय देशमुखांसह कुटुंबीयांची भेट घेऊन केलं सांत्वन https://tinyurl.com/5ha8rc46
8. 'UAPA नुसार कोणत्याही व्यक्तीला दहशतवादी ठरवण्याचा केंद्राला अधिकार', सर्वोच्च न्यायालय म्हणाले, आम्ही याचिकेवर सुनावणी घेणार नाही, त्याआधी उच्च न्यायालयात सुनावणी होऊ द्या https://tinyurl.com/2ke3zvux आमच्या स्वच्छता मोहिमेची खिल्ली उडवली, पण सरकारी कार्यालयातील भंगार विकून 2300 कोटी कमावले : PM नरेंद्र मोदी https://tinyurl.com/2fytc499
9. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले, अभिनेता राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याने वाद; आमदार जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरींचा पलटवार, म्हणाले, बहुजनांबद्दलच्या द्वेषाची ब्राह्मणवादी मानसिकता उफाळून बाहेर आली https://tinyurl.com/3pctcwrx शिवाजी महाराज महाराज आग्र्याहून सुटताना राहुल सोलापूरकर तिथे होता का? : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचा सवाल https://tinyurl.com/bdh8e8su
10. थोडक्यातच वाचला अभिनेता अभिषेक बच्चन; वानखेडे स्टेडियमवरील कॅफेमधून बाहेर पडताना डोक्यावर पडलं शटर, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ https://tinyurl.com/yms7zs8v कार्यक्रमात स्टंट करणं अभिनेता अर्जून रामपालला पडलं महागात, काच फोडताना दुखापत, हातातून वाहू लागलं रक्त https://tinyurl.com/6acpxk6d
एबीपी माझा स्पेशल
सॉवरेन गोल्ड बॉण्ड गुंतवणूकदारांना मोठा धक्का? सरकार अंग काढून घेणार, स्वस्तात सोनं मिळवण्याचे दिवस संपले
https://tinyurl.com/h8trjpbu
बोगस पीक विमा भरणाऱ्यांना दणका, राज्यासह परराज्यातील 96 सीएससी आयडी ब्लॉक, उत्तर प्रदेश, हरियाणातील सेंटर्सचा समावेश
https://tinyurl.com/4vwnjs6v
जीबीएस रुग्णांच्या घरातील पाण्याचे 2 अहवाल, पाणी पिण्यायोग्य आहे की नाही? पालिकेमुळं पिंपरी चिंचवडमध्ये संभ्रम, नक्की प्रकार काय?
https://tinyurl.com/yw5rk947
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























