एक्स्प्लोर

ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका

आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत सूरज चव्हाण यांची तुलना लढणाऱ्या वाघाशी करत एकनाथ शिंदेंच्या पक्षाला डिवचल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेले आणि कथित खिचडी घोटाळ्यात कोठडीत असलेले युवासेनेचे नेते सूरज चव्हाण (Suraj chavan) यांना मोठा आज मोठा दिलासा मिळाला आहे.मुंबई उच्च न्यायालयाकडून सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर केला, 1 लाखाच्या रोख मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 17 जानेवारी 2024 पासून सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली होती, अखेर आज त्यांची जामीनावर सुटका झाली. सुटकेनंतर सूरज चव्हाण आपल्या कुटुंबासमवेत मातोश्री निवासस्थानी पोहोचले. तत्पूर्वी, आज सायंकाळी 5 वाजता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी, आदित्य ठाकरेंनी कडाडून मिठी मारत सूरज चव्हाणचं स्वागत केलं. तसेच, मातोश्रीवरही त्यांना घेऊन गेले. मात्र, या भेटीवर मंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खोचक टोला लगावला. ठाकरेंनी कधी सूरजला जेलमध्ये जाऊन डबा दिला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.  
 
आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत सूरज चव्हाण यांची तुलना लढणाऱ्या वाघाशी करत एकनाथ शिंदेंच्या पक्षाला डिवचल्याचं पाहायला मिळालं. एक प्रामाणिक माणूस, आमचा लढणारा वाघ आणि भाऊ... सूरज! अशी पोस्ट त्यांनी लिहली आहे. तसेच, तुरुंगाबाहेर आलेल्या सूरज चव्हाण यांना आदित्य ठाकरेंनी कडकडून मिठी देखील मारल्याचं पाहायला मिळालं. सूरज चव्हाण यांच्या सुटेकचा शिवसेना व ठाकरे कुटुंबीयांकडून आनंद साजरा होत आहे. त्यावरुन, शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. 

आदित्य ठाकरे यांना झोपडपट्टीधारकांचा पुळका येतो हेच आश्चर्य आहे,  त्यांनी 25 वर्षे मुंबईकरांना खड्ड्यात घातले. त्यांना नाईट लाईफ आवडते, रात्री सगळे झगमग दिसतं, असे म्हणत संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. सूरज चव्हाण आदित्य ठाकरेंना भेटला हा त्याचा मोठेपणा आहे, या ठाकरे कुटुंबाने त्याला कधी जेलमध्ये जाऊन डबा दिला का? आदित्य ठाकरे लंडन फीरायला गेले, पण सूरज चव्हाण यांना भेटायला कधी जेलमध्ये गेले का, असा सवाल संजय शिरसाट यांनी ठाकरे-चव्हाण भेटीवर उपस्थित केला आहे. तसेच, हे लोक शिवसेना संपवायला आहेत, अशी टीकाही ठाकरेंवर केली. 

संजय राऊत वेड्यासारखं बोलतात

पुन्हा एकदा संजय राऊत यांनी वेडेपणाचा कळस गाठला आहे, हा माणूस 24 तास नशेत असतो. ज्याला स्वतःची भीती वाटते तोच असं वेड्यासारखा बोलू शकतो. उठावाच्या वेळेस आम्हाला कुठे टोचले हे तुम्हाला समजलं असेल, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर झालेल्या टीकेवरुन संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. 

आदित्य ठाकरेंकडून जादू की झप्पी

आदित्य ठाकरेंकडून कलिना गेटवर सूरज चव्हाण यांची वाट पाहिली जात होती, तेव्हा कारमधून उतरताच सूरज चव्हाण यांनी आदित्य यांना कडकडून मिठी मारली. आदित्य ठाकरेंसोबत तिथे थोडी चर्चा झाल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या कारमधून दोघेही मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी रवाना झाल्याचं दिसून आलं. 

हेही वाचा

आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget