एक्स्प्लोर

SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय

दहावी बारावी बोर्ड परीक्षा दरम्यान संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जाणार आहे.

मुंबई : राज्यातील 10 वी (SSC Exam) आणि 12 वीच्या परीक्षांचे वेध आता विद्यार्थ्यांना लागले असून अभ्यासाची तयारीही सुरू आहे. राज्य शासनाने यंदाची बोर्ड परीक्षा अधिक गांभीर्याने घेतली असून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी आता महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कॉपीमुक्त परीक्षांसाठी सरकारने राज्यातील काही संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनचा (Drone) वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांवेळी स्थानिक गुंडगिरी व स्थानिक यंत्रणांवर दबाव टाकून परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस येतात. या कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यातील दहावीची बोर्ड परीक्षा (Exam) 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. 

दहावी बारावी बोर्ड परीक्षा दरम्यान संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. बोर्ड परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनाकडून व्हिडिओ चित्रीकरण केलं जाणार आहे. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची (FCR) Facial Recognition System व्दारे म्हणजे फेस रिडींगद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी बोर्डाकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रावर व आसपासच्या परिसरात  जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन द्वारे निगराणी केली जाणार आहे. परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण देखील करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके उपलब्ध होतील याचेही नियोजन करण्यात येणार आहे.

परीक्षा केंद्रावजवळील 500 मीटर परिसरात झेरॉक्स दुकाने बंद

जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची Facial Recognition System व्दारे तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. Maharashtra Prevention of Malpractices Act 1982 या कायद्याची अंमलबजावणी करावी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात येईल.

हेही वाचा

देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 March 2025Gadchiroli Honey Bee : मधमाशांशी फ्रेंडशिप, घरात 8-10 पोळं, मधमाशांसोबत राहणारं कुटुंबNagpur Rada Update : दंगलीत सहभागी होण्यासाठीच आले होते 'ते' 24 आरोपी दंगलग्रस्त भागातले नाहीचRSS : विश्व हिंदू परिषदेचे आठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलिसांना शरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
60 वर्षाचा आमिर करणार तिसऱ्यांदा लग्न!
60 वर्षाचा आमिर करणार तिसऱ्यांदा लग्न!
Embed widget