(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Milk Side Effects : काय सांगता? दूध पिण्याचे फायदेच नाही तोटेही; काय आहे भानगड? वाचा सविस्तर...
Milk Side Effects : दूध आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. पण जास्त दूध प्यायल्यानेही नुकसान होऊ शकते. जास्त प्रमाणात दुधाचे सेवन करणे हानिकारक ठरू शकते. याबद्दल सविस्तर माहिती वाचा.
Lactose Food Milk Side Effects : दूध (Milk) आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. यामुळे अनेक वेळा लहान मुले असो वा प्रौढ त्यांनी ताकद (Energy) आणि कॅल्शिअम (Calcium) वाढण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दुधामध्ये कॅल्शियमसह अनेक फायदेशीर घटक असतात. हे घटक आपल्या शरीरातील हाडांच्या विकासासाठी आणि त्यांना मजबूत बनविण्यासाठी मदत करतात. दुधामुळे आपलं आरोग्य चांगले राहतं, असंही म्हटलं जातं. पण जास्त दूध प्यायल्यानेही नुकसान होऊ शकते. जास्त प्रमाणात दुधाचे सेवन करणे हानिकारक ठरू शकते. याबद्दल सविस्तर माहिती वाचा.
1. पचनासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता
जास्त दूध प्यायल्याने शरीरातील लॅक्टोजचे प्रमाण वाढते, हे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते. यामुळे पचनासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. दुधाच्या अधिक सेवनामुळे ओटीपोटात सूज येणे किंवा अतिसाराची समस्या जाणवू शकते. याचं कारण म्हणजे आपलं शरीर जास्त प्रमाणात लॅक्टोजचं योग्य प्रमाणात विघटन करण्यात अयशस्वी ठरते. काही लोकांना दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळे पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
2. वजन वाढू शकते
जास्त दूध प्यायल्याने वजनही वाढू शकते. आरोग्यदायी आहारासाठी दूध, दही आणि चीज यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहते, असे संशोधनातून दिसून आले आहे. पण दुधाचे अधिक सेवन लठ्ठपणाला कारणीभूत ठरते.
3. दुधामुळे काही कर्करोग होऊ शकतात
काही संशोधनातून असे समोर आले आहे की, जास्त दुधामुळे प्रोस्टेट, स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. दरम्यान, यासंदर्भात अधिक संशोधन सुरु आहे. त्यानंतरच याबाबत अधिक स्पष्टता येईल.
4. मळमळ होणे
जास्त प्रमाणात दूध सेवन केल्याने मळमळ होऊ शकते. अमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, 65 टक्के प्रौढांना लॅक्टोज इंटॉलरेंस (Lactose intolerance) असते. याचा सोपा अर्थ म्हणजे लॅक्टोज ॲलर्जी. लॅक्टोज इंटॉलरेंसमध्ये तुमचं शरीर लॅक्टोज योग्य प्रकारे पचवू शकत नाही. त्यामुळे लॅक्टोज युक्त कोणत्याही प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थाचे सेवन केल्यास अशा व्यक्तींना उलट्या होऊ शकतात.
5. पुरळ येऊ शकते
एका संशोधनादरम्यान असे समोर आले आहे की, दूध प्यायल्याने मुरुमांची समस्या उद्भवू शकते. संशोधनानुसार, दावा करण्यात आला आहे की, दुग्धजन्य पदार्थांमुळे मुरुम निर्माण करणारे हार्मोन्स वाढतात. याशिवाय लिव्हरचा त्रास असलेल्या व्यक्तीने दूधाचं सेवन टाळावे. गॅसची समस्या असलेल्या लोकांनीही दुधाचे सेवन कमी करावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )