Delhi Election : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Delhi Election : केजरीवाल यांच्या घरात बॉडी सेन्सर्ससह 80 पडदे आणि 4 कोटी ते 5.6 कोटी रुपयांचे रिमोट, 64 लाख रुपयांचे 16 टीव्ही, 10-12 लाख रुपयांचे टॉयलेट सीट, 36 लाख रुपयांचे सजावटीचे पोल आहेत.
Delhi Election : भाजपने दिल्लीच्या सीएम हाऊसचा एक नवीन व्हिडिओ जारी केला. या बंगल्यात माजी मुख्यमंत्री केजरीवाल राहत होते. भाजपने व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करण्यासोबतच भाजपने घरात असलेल्या वस्तूंचे दरही सांगितले. भाजपच्या दाव्यानुसार, केजरीवाल यांच्या घरात बॉडी सेन्सर्ससह 80 पडदे आणि 4 कोटी ते 5.6 कोटी रुपयांचे रिमोट, 64 लाख रुपयांचे 16 टीव्ही, 10-12 लाख रुपयांचे टॉयलेट सीट, 36 लाख रुपयांचे सजावटीचे पोल आहेत.
आप म्हणजे अवैध उत्पन्न असलेला पक्ष
गृहमंत्री अमित शहा यांनी 'आप'ला अवैध कमाईचा पक्ष म्हटले. नरेला येथील रॅलीदरम्यान ते म्हणाले की, 'आप'ने खोटे बोलून मते गोळा केली आहेत. आप म्हणजे अवैध उत्पन्न असलेला पक्ष. ते दिल्लीच्या पैशाने पंजाब, गुजरात आणि गोव्यात निवडणूक लढवतात. शाह म्हणाले की, आप नेते म्हणाले होते की, आम्ही राजकीय लोक नाही, आम्ही पक्ष काढणार नाही, पण या लोकांनी पक्ष स्थापन केला. आम्ही काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही, असे ते म्हणाले होते, काँग्रेसचा पाठिंबा घेतला. आम्ही सुरक्षा, गाडी, बंगला घेणार नाही, असे ते म्हणाले होते, मात्र त्यांनी सुरक्षा, कार घेऊन करोडोंचा शीशमहाल बांधला.
क्या आपने जनता के टैक्स के पैसे से बना करोड़ों का शीशमहल अंदर से देखा है?
— BJP Delhi (@BJP4Delhi) January 26, 2025
आइए आपको सैर कराएं महाठग अरविंद केजरीवाल के अय्याशी के शीशमहल का #केजरीवाल_का_शीशमहल pic.twitter.com/d3m38dOle6
डिसेंबरमध्येही भाजपने केजरीवाल यांच्या घराचा व्हिडिओ जारी केला होता
9 डिसेंबर रोजी भाजपने आरोप केला होता की, स्वत:ला सामान्य माणूस म्हणवणाऱ्या केजरीवाल यांनी त्यांच्या निवासस्थानासाठी 'शीशमहल' बांधला होता. केजरीवाल म्हणायचे सरकारी घर घेणार नाही, पण राहण्यासाठी ७ स्टार रिसॉर्ट बनवले. या पॅलेसमध्ये संगमरवरी ग्रॅनाइट, दिवाबत्ती, दीड कोटी रुपयांची दुरुस्ती आणि 35 लाख रुपये खर्चून जिम आणि स्पा बांधण्यात आला आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले होते की, कोविडमुळे सार्वजनिक विकासाची कामे ठप्प असताना केजरीवाल यांनी कोणत्या अधिकाराने आपल्या बंगल्याच्या सजावटीवर सुमारे 45 कोटी रुपये खर्च केले ते दिल्लीच्या जनतेला सांगावे. भाजपच्या आरोपावर आम आदमी पार्टीने (आप) म्हटले होते की, हे घर 1942 मध्ये बांधले गेले होते आणि ते अतिशय खराब स्थितीत होते. घराच्या छताला गळती लागली होती. काही पडल्याही होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑडिटनंतरच घराची दुरुस्ती करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या