Ajit Pawar Baramati Speech : ड्रोनच्या घिरट्या ते लाडकी बहीण योजना, दादांचं पुण्यात भाषण
Ajit Pawar Baramati Speech : ड्रोनच्या घिरट्या ते लाडकी बहीण योजना, दादांचं पुण्यात भाषण
पणदरे या ठिकाणी जी घटना घडली,ही चुकीची आहे.. त्यामुळे पालकांनी शेती करत असताना आपल्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे.. सोशल मीडियावर काही ग्रुप काढले आहेत,त्यावर चुकीचं काम करत आहेत..त्यामुळे ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत.. पोलीस प्रशासनाला चांगल्या सुविधा देत आहोत,त्यामुळे त्यांनी कायदा सुव्यवस्था नीट राखली पाहिजे.. ड्रोन प्रकरणामुळे शेतकरी भयभीत आहेत,त्यामुळे मी दोन गण मशीन दिल्या असून, यावर एक तोडगा निघेल.. अशा ड्रोन मधून पाकिस्तान सारखी राष्ट्रे ड्रगज पाठवत आहेत,चुकीची कामे करीत आहेत.. त्यामुळे अशा गोष्टींना आळा बसवण्यासाठी दोन आधुनिक मशीन गण दिल्या आहेत.. या गण मधून असे प्रकार रोखता येईल.. पुण्यातील अल्पवयीन गुन्ह्यातील मुलांचे वय आम्ही कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत यासंदर्भात मी अमित शहा यांची शी बोललो देखील आहे गुन्हेगारीत बालकांचा वापर केला जातो त्यामुळे 14 वरती वय आणण्याचा आमचा प्रयत्न आहे मी अमित शहा यांच्याशी बोलणार आहे,बघू यात किती यश येतय ते.. कोण जर उडाणपणा असेल तर कोणाच्या जवळ चा असेल तर त्यांचा बंदोबस्त करा... नाहीतर भावकी उण्याची वाटेकरी असती याचा मला अनुभव आला आहे.. कायदा सुव्यवस्था नीट कशी राहील याकडे पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे.. फक्त शेती करून चालणार नाही,याला पूरक व्यवसाय केला पाहिजे,हे पवार साहेब आणि मी नेहमी सांगत आहे.. तरुण पिढीने काळानुरुप बदलले पाहिजे.. लवकरच शासकीय पशुवैद्यकीय कॉलेज करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे..त्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांची गरज आहे.. या पाच वर्षात बारामती,पुणे जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.. मी जेवढं काम करतो,त्याच्या २५ टक्के काम माझ्या कार्यकर्त्यांनी केल तेवढं बारामतीकरांच भल होईल... फोरलेन रस्ते थोड्या दिवसात होणार आहेत,त्यामुळे रस्त्याच्या कडेला जास्त जावू नका,घरे बांधू नका... मी माझ्या काटेवाडी येथे अनेक नारळाची झाडे लावली,अनेकदा माझे नारळ चोरीला गेले,मात्र माझी आई मला सांगायची किती झाडे लावतोस...मात्र चोरी करणारा थकतोय की मी थकतोय अस सांगितला. बिचारा चोरणारा लाजून थकला (अजित पवारांनी सांगितला किस्सा) हे कार्यालय जरी जगताप यांचा असेल तर भावकीने याचे न चुकता पैसे दिले पाहिजेत..