Makrand Jadhav Buldhana : स्वागताला एकही आमदार आला नाही, पालकमंत्री म्हणाले,"माहीत नाही.."
Makrand Jadhav Buldhana : स्वागताला एकही आमदार आला नाही, पालकमंत्री म्हणाले,"माहीत नाही.."
नवीन व पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेल्या पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या स्वागताला भाजपाचा एकही आमदार नाही...?
पालकमंत्री पदावरून बुलढाण्यात नाराजी नाट्य...?
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतलं. मात्र यावेळी त्यांच्या स्वागताला बुलढाणा जिल्ह्यातील भाजपचे असलेल्या चार आमदारांपैकी एकही आमदार हजर नव्हते... बुलढाणा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे चार आमदार असून पालकमंत्री पद मात्र एकच आमदार असलेले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला देण्यात आले आहे... आणि त्यामुळे कुठेतरी महायुतीत नाराजी तर नाही ना...? बुलढाण्यातील चार आमदारांपैकी एकही आमदार नवीन व पहिल्यांदा आलेल्या पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी गैरहजर का..? त्यामुळे बुलढाण्यात भाजपचे आमदार नाराज तर नाहीत ना...? जिल्ह्यात आता महायुतीत बेबनाव तर नाही ना अशा चर्चा सुरू आहेत.