एक्स्प्लोर

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या

Donald Trump : अमेरिकेची यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट जगभरातील विकास कामांसाठी मदत करते. लोकशाहीला चालना देणे आणि गरिबी कमी करणे हा यामागचा उद्देश आहे.

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने बांगलादेशला देण्यात येणारी सर्व मदत बंद करण्याचा निर्णय घेतला. युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) ने बांगलादेशातील सर्व प्रकल्प बंद करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. USAID कडून पत्रही जारी करण्यात आले आहे. या पत्रात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील कार्यकारी आदेशाचा हवाला देत म्हटले आहे की, आम्ही सर्व यूएसएआयडी भागीदारांना यूएसएआयडी आणि बांगलादेश करारांतर्गत केले जाणारे अनुदान, सहकारी करार किंवा इतर मदतीचे काम त्वरित थांबवण्याचे आदेश देत आहोत.

तत्पूर्वी, ट्रम्प प्रशासनाने शुक्रवारपासून इस्रायल, इजिप्त आणि अन्न कार्यक्रम वगळता परदेशातील सर्व मदतीवर बंदी घातली आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, अमेरिकेच्या राज्य मंत्रालयाच्या या आदेशात गरीब देशांना आरोग्य मदत देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

USAID कसे काम करते?

अमेरिकेची यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट जगभरातील विकास कामांसाठी मदत करते. लोकशाहीला चालना देणे आणि गरिबी कमी करणे हा यामागचा उद्देश आहे.

बांगलादेश आर्थिक संकटाचा सामना करत आहे

फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशचे आर्थिक मॉडेल सपशेल अपयशी ठरल्याची भीती तज्ज्ञांना आहे. जागतिक बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी बांगलादेशचा GDP वाढीचा अंदाज 0.1 टक्के ने कमी करून 5.7 टक्के केला आहे. महागाईचा दर 10 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. अमेरिकेची मदत थांबल्यामुळे बांगलादेशच्या अडचणी आणखी वाढू शकतात. सतत वाढत जाणारी अर्थसंकल्पीय तूट, घसरणारा परकीय चलन साठा, घसरणारे चलन मूल्य आणि वाढती उत्पन्न असमानता यासारख्या संकटांनी बांगलादेशसाठी आधीच अडचणी निर्माण केल्या आहेत. बांगलादेशची अर्थव्यवस्था झपाट्याने घसरत आहे. 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांची उचलबांगडी झाल्यापासून 10 लाखांहून अधिक लोक बेरोजगार झाले आहेत. आर्थिक संकटामुळे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. बांगलादेशच्या लोकसंख्येच्या मोठ्या भागाला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो.

बांगलादेशचे अंतरिम सरकार डेमोक्रॅट पक्षाचे समर्थक मानले जाते

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हे अमेरिकेतील विरोधी डेमोक्रॅट पक्षाचे समर्थक मानले जातात. चार महिन्यांपूर्वी मोहम्मद युनूस यांनी यूएनजीएच्या बैठकीत भाग घेतला होता. यावेळी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी त्यांना मिठी मारली होती. 

ट्रम्प यांनी युनूस सरकारवर टीका केली होती

याशिवाय अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान बांगलादेशच्या अंतरिम सरकारवर हिंदूंवर हल्ले केल्याचा आरोप केला होता. तेव्हा ट्रम्प म्हणाले होते की, बांगलादेशातील जमाव हिंदूंवर हल्ले करत आहे आणि लुटत आहे. तेथे अराजकतेची स्थिती आहे. माझ्या कार्यकाळात असे कधीच घडले नाही. कमला आणि बिडेन यांनी अमेरिकेसह जगभरातील हिंदूंची उपेक्षा केली आहे.

बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा

दुसरीकडे, पाकिस्तान आणि बांगलादेशने परस्पर संबंध दृढ करण्यासाठी दोघांमध्ये थेट हवाई सेवा सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, बांगलादेशचे उच्चायुक्त मोहम्मद इक्बाल हुसैन यांनी शनिवारी पाकिस्तानातील पेशावरमध्ये प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. 2018 पासून दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवा नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
Delhi Election : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Video : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांनी ठणकावून सांगितलं
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांनी ठणकावून सांगितलं
Weather Update: राज्यात येत्या 48 तासात तापमानात चढ-उतार, कुठे काय स्थिती? वाचा IMD सविस्तर अंदाज 
सूर्याचे उत्तरायण सुरू, येत्या 48 तासात तापमानात मोठे बदल, वाचा IMD सविस्तर अंदाज 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 27 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Baramati Speech : ड्रोनच्या घिरट्या ते लाडकी बहीण योजना, दादांचं पुण्यात भाषणMahendra Dalvi on Sunil Tatkare : भरतशेठ पालकमंत्री होईपर्यंत तटकरेंना कायम अंगावर घेईनMakrand Jadhav Buldhana : स्वागताला एकही आमदार आला नाही, पालकमंत्री म्हणाले,

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
Delhi Election : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Video : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांनी ठणकावून सांगितलं
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांनी ठणकावून सांगितलं
Weather Update: राज्यात येत्या 48 तासात तापमानात चढ-उतार, कुठे काय स्थिती? वाचा IMD सविस्तर अंदाज 
सूर्याचे उत्तरायण सुरू, येत्या 48 तासात तापमानात मोठे बदल, वाचा IMD सविस्तर अंदाज 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Embed widget