IPL 2025 Dewald Brevis : MS धोनीच्या CSK चा मास्टरस्ट्रोक; मुंबईचा चॅम्पियन खेळाडू लागला गळाला, चालू हंगामातून अचानक कोणी घेतली माघार?
चालू आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे.

Dewald Brevis joins MS Dhoni CSK IPL 2025 : चालू आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे. संघात एका नवीन खेळाडूचा समावेश झाला आहे. लवकरच तो त्याच्या संघाकडून खेळताना दिसेल. आपण डेवॉल्ड ब्रेव्हिसबद्दल बोलत आहोत. जो यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता, पण यावेळी तो विकला गेला नाही, पण आता चेन्नई सुपर किंग्जने त्याला संधी देण्याचा विचार केला आहे. यामुळे संघ आणखी मजबूत होईल. डेवाल्ड ब्रेव्हिस हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात.
गुर्जपनीत सिंगच्या जागी डेवाल्ड ब्रेव्हिसचा समावेश
चेन्नई सुपर किंग्जने अलीकडेच सोशल मीडियावर घोषणा केली की, गुर्जपनीत सिंग दुखापतीमुळे या हंगामात आयपीएलमधून बाहेर पडला आहे. संघाने कळवले की त्याच्या जागी डेवाल्ड ब्रेव्हिसने संघात स्थान मिळवले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एका भारतीय खेळाडूच्या जागी एक परदेशी खेळाडू कसा आला? गुर्जपनीत सिंग भारतीय आहे. पण जेव्हा लिलाव झाला तेव्हा चेन्नई संघाने आपल्या संघात फक्त सात परदेशी खेळाडूंचा समावेश केला. बीसीसीआयच्या नियमांनुसार, कोणताही संघ आठ परदेशी खेळाडूंना आपल्या संघात ठेवू शकतो. याचा अर्थ असा की चेन्नईमध्ये एक परदेशी खेळाडूची जागा रिक्त होती, जिथे संघाने डेवाल्ड ब्रेव्हिसचा समावेश केला आहे.
🚨 OFFICIAL STATEMENT 🚨
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 18, 2025
Gurjapneet Singh ruled out of IPL 2025 due to an injury.
Wishing him a speedy recovery! 💪🏻💛#WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/4NWmxF5ODu
डेवाल्ड ब्रेव्हिस मुंबईकडून खेळला आयपीएल
मूळचा दक्षिण आफ्रिकेचा रहिवासी असलेला डेवाल्ड ब्रेव्हिसची तुलना एबी डिव्हिलियर्सशी केली जाते. याआधी तो मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळला आहे. तो आयपीएल 2022 आणि 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता. या काळात त्याने या संघासाठी 10 सामने खेळले आहेत आणि 230 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 23 आहे आणि तो 133.72 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतो. पण, त्याला आयपीएलमध्ये या संघाकडून खेळण्याची फार कमी संधी मिळाली.
Bringing a whole lot of Protea Firepower! 💪🏻#WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/9seFMWU1fI
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 18, 2025
सीएसकेसमोर फलंदाजीचे संकट
चेन्नई संघ सध्या फलंदाजीमध्ये अडचणीत आहे. दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड आधीच संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यानंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी एमएस धोनीवर सोपवण्यात आली आहे. उर्वरित फलंदाजही काही खास कामगिरी करू शकले नाहीत. अशा परिस्थितीत, डेवाल्ड ब्रेव्हिस त्याच्या संघात सामील होताच, तो लवकरच खेळताना दिसेल. सीएसके संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये दहाव्या क्रमांकावर असला तरी तो अजूनही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. जर संघाने येथून विजयी मालिका सुरू केली तर तो टॉप 4 मध्ये पोहोचू शकतो.
अशी होती डेवाल्ड ब्रेव्हिसची आयपीएलमधील कारकीर्द
एवढेच नाही तर ब्रेव्हिस सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अलिकडेच, त्याने क्रिकेट साउथ आफ्रिकेच्या डिव्हिजन-1 टी-20 स्पर्धेतील शेवटच्या 6 डावांमध्ये एक शतक आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत. त्याच्या टी-20 कारकिर्दीत, या फलंदाजाने 145 च्या स्ट्राईक रेटने 1787 धावा केल्या आहेत. यामध्ये आयपीएलचाही समावेश आहे, जिथे तो 2 हंगाम खेळला. ब्रेव्हिसने 2022 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले आणि त्याच्या पहिल्याच हंगामात त्याने 7 सामन्यांमध्ये 142 च्या स्ट्राईक रेटने 161 धावा केल्या. पण, 2023 मध्ये त्याला संधी मिळाली नाही आणि 2024 मध्ये तो 3 सामन्यांमध्ये फक्त 69 धावा करू शकला. यानंतर, मुंबईने त्याला सोडले आणि यावेळीही त्याला मेगा लिलावात कोणताही खरेदीदार मिळाला नाही.





















