लघवीवर नियंत्रण राखता येत नाही? 'या' महत्वाच्या टिप्सचे पालन करा : डॉ. भाविन पटेल
स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टीनेंस (SUI) ही सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहे, जी केवळ शरीरावरच नाही तर एखाद्याच्या मनावर देखील परिणाम करते.

मुंबई : स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टीनेंस (SUI) ही सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहे, जी केवळ शरीरावरच नाही तर एखाद्याच्या मनावर देखील परिणाम करते. थोड्याशा शारीरिक हालचालींनंतरही थेंब थेंब लघवी झाल्याने अनेक महिलांनी लाजिरवाणे वाटणे, भीती वाटणे आणि यामुळं बऱ्याचदा चिंताग्रस्त वाटू लागते. अशा काळात काही टीप्स महत्वाच्या ठरतात. याबाबतची माहिती झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे चेंबूरचे मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. भाविन पटेल यांनी दिली आहे.
स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टीनेंस (SUI) ही एक सामान्य स्थिती आहे जिथे महिला मूत्राशयावर दबाव आणणाऱ्या क्रियाकलाप करताना अनावधानाने मूत्र गळती होते. यामध्ये खोकणे, शिंकणे, हसणे, व्यायाम करणे किंवा एखादी जड वस्तू उचलणे यांचा समावेश आहे. हे अनेकांसाठी लाजिरवाणे आणि निराशाजनक असू शकते. जरी ते घातक नसले तरी ते महिलांच्या आत्मविश्वासावर, दैनंदिन जीवनावर आणि भावनिक आरोग्यावर परिणाम करते. मूत्राशयाला आधार देणारे पेल्विक फ्लोअर स्नायू जेव्हा कमकुवत होतात तेव्हा ही समस्या उद्भवते. बाळंतपण, रजोनिवृत्ती किंवा ओटीपोटाच्या शस्त्रक्रियेनंतर हे अधिक सामान्य आहे. परंतू, तरुण महिलांना, विशेषतः ज्या अनेकदा व्यायाम करतात किंवा वजन उचलतात त्यांनाही ही समस्या उद्भवू शकते.
काय आहेत त्यामीगची कारणं?
· बाळंतपणामुळे ओटीपोटाचे स्नायू कमकुवत होतात
· रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोनल बदल होतात
· लठ्ठपणासारख्या कारणामुळे मूत्राशयावरील दबाव वाढतो
· जुनाट खोकला किंवा बद्धकोष्ठतेची समस्या
· वृद्धत्व आणि ओटीपोटाच्या शस्त्रक्रिया
· ओटीपोटासंबंधीत विकार
· धूम्रपान
लक्षणे कोणती?
· शारीरिक हालचाली दरम्यान मूत्र गळती होणे
· ओटीपोटात दबाव किंवा जडपणा जाणवणे
· सामाजिक किंवा शारीरिक क्रिया टाळणे
· वाकताना किंवा जड वस्तू उचलताना मूत्र गळती होणे
· हसताना लघवी होणे
स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टीनेंस (SUI) हे नैराश्यास कारणीभूत ठरू शकते. अनेक महिलांसाठी, स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टीनेंस (SUI) ही शारीरिक समस्येपेक्षा अधिक मोठी समस्या ठरते. खूप जोरात खोकला किंवा शिंका आल्यावर किंवा मोठ्यानं हसल्यानंतर अनेक महिलांना नकळत लघवी होते त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, ते एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचे टाळतात किंवा त्यांच्या मनात एक प्रकारची भिती निर्मांन होते. या समस्येमुळे काही महिला जिममध्ये जाणे टाळतात, लांब प्रवास करणे टाळतात किंवा या समस्येशी झुंजत असल्याने बाहेर पडणे टाळू लागतात. ही समस्या अनेकदा दुर्लक्षित राहते, कारण अनेकांना त्यांच्या डॉक्टरांशीही याबद्दल बोलण्यास खूप लाज वाटते. त्यांना शांतपणे संघर्ष करावा लागू शकतो. कालांतराने, यामुळे नैराश्य, नातेसंबंधातील समस्या आणि जीवनाची गुणवत्ता खालावू शकते. हे एखाद्याच्या दैनंदिन दिनचर्येत व्यत्यय आणते. हे समजून घेणे महत्वाचे आहे की स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टीनेंस ही एक वैद्यकीय समस्या असून त्यामध्ये लपवण्यासरखी किंवा लाज वाटण्यासारखीकोणतीही बाबत नाही. म्हणून, वैद्यकीय मदत घेण्यास उशीर करू नका. वेळेवर व्यवस्थापन या समस्येचा सामना करण्यास मदत करते.
स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टीनेंस व्यवस्थापित करण्यासाठी टिप्स
दररोज न चुकता ओटीपोटाचे व्यायाम करा. सोप्या व्यायामांनी सुरुवात करा जेणेकरुन तुमचे पेल्विक फ्लोअरचे स्नायू मजबूत होतील. कॅफिन, अल्कोहोल आणि मसालेदार पदार्थ यासारख्या मूत्राशयाला त्रासदायक ठरणाऱ्या पदार्थांचे सेवन टाळा. वजन नियंत्रित राखा, सुरक्षित वाटण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी पॅड किंवा पॅंटी लाइनरचा वापर करा. स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टीनेंस ही समस्या उपचार करण्याजोगी असून तज्ज्ञांची भेट घ्या. औषधोपचारांमध्ये फिजिओथेरपी, जीवनशैलीतील बदल, औषधे किंवा कमीत कमी आक्रमक शस्त्रक्रियेचा समावेश आहे. मिड्यूरेथ्रल स्लिंग प्रक्रिया ही मूत्रमार्गाला आधार देऊन आणि शारीरिक हालचाली दरम्यान मूत्र गळती रोखून स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टीनेंस वर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी मिनीमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया आहे.
स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टीनेंस ही समस्या लाखो महिलांना प्रभावित करते, परंतु त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचारांनी ही स्थिती सुधारता येते. वेळीच मदत घेणे, मोकळेपणाने चर्चा करणे गरजेचे आहे. तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेत आत्मविश्वासाने जगण्यासाठी वेळीच या समस्येला दूर करा आणि निरोगी जीवनशैली बाळगा.
महत्वाच्या बातम्या:
Patanjali News: आयुर्वेदिक अन् हर्बल उत्पादनांपलिकडे पतंजलीची शिक्षण आरोग्य क्षेत्रात वेगळी ओळख
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
























