एक्स्प्लोर

Swatantrya Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर

Swatantrya Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याबाबत राज्य सरकारने केंद्राला शिफारस करावी, असा ठराव सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मांडला होता.

Swatantrya Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantrya Veer Savarkar ) यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार (Bharat Ratna Award) देण्याबाबत केंद्र सरकारकडे (Central Government) शिफारस करावी, असा ठराव माजी मंत्री व भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधानसभेत मांडला होता. मात्र हा अशासकीय ठराव अखेर मागे घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून अशा प्रकारची शिफारस करणे नियमबाह्य ठरेल, अशी भूमिका सरकारतर्फे मांडण्यात आल्यानंतर मुनगंटीवार यांनी खंत व्यक्त करत हा ठराव मागे घेतला.

विधानसभा नियम 106 अंतर्गत गुरुवारी रात्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा अशासकीय ठराव सभागृहात मांडला होता. स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मुनगंटीवार यांनी सावरकर यांच्या कार्याचा उल्लेख करत भावनिक आणि प्रभावी भाषण केले. सभागृहातील अनेक आमदारांनी या ठरावाला पाठिंबा दर्शवला.

Jaykumar Rawal: भारतरत्न पुरस्कार देण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे

या ठरावावर सरकारतर्फे उत्तर देताना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी भारतरत्न पुरस्कार देण्याची प्रक्रिया स्पष्ट केली. भारतरत्न पुरस्कार देण्याचा अधिकार हा केंद्र सरकारकडे असून पंतप्रधान राष्ट्रपतींकडे त्याबाबत शिफारस करतात. त्यामुळे राज्य सरकारकडून थेट अशी शिफारस करणे नियमांनुसार शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावे, ही राज्य सरकारची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Jaykumar Rawal: अशासकीय ठराव केंद्र सरकारकडे पाठवणे नियमबाह्य ठरेल

अशासकीय ठराव केंद्र सरकारकडे पाठवणे नियमबाह्य ठरेल, त्यामुळे मुनगंटीवार यांनी हा ठराव मागे घ्यावा, अशी विनंतीही मंत्री रावल यांनी सभागृहात केली. त्यावर मुनगंटीवार यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न देण्याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस केल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच हा अशासकीय ठराव शासकीय ठरावात रूपांतरित करून केंद्राकडे पाठवावा, अशीही मागणी त्यांनी केली.

Sudhir Mungantiwar: सुधीर मुनगंटीवार यांनी ठराव घेतला मागे

यावर मंत्री रावल यांनी स्पष्ट केले की, शासकीय ठराव मांडण्याची ठराविक प्रक्रिया असते. तो प्रथम मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करावा लागतो आणि त्यानंतरच तो विधानसभेत मांडता येतो. या प्रक्रियेअंतीच पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारची भूमिका लक्षात घेऊन अखेर सुधीर मुनगंटीवार यांनी खंत व्यक्त करत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबतचा आपला अशासकीय ठराव मागे घेतला. 

आणखी वाचा 

Shripad Chindam: शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
मोठी बातमी! प्रवीण दरेकर पुढचे सहकार मंत्री, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; आता, भाजपकडून स्पष्टीकरण
मोठी बातमी! प्रवीण दरेकर पुढचे सहकार मंत्री, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; आता, भाजपकडून स्पष्टीकरण
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
Jitendra Shelke Accident : हा अपघात घडवून आणला नाही ना? खरातच्या निकटवर्तीयाचा मृत्यू; रोहित पवार, सुषमा अंधारेंना संशय, खळबळजनक दावा
हा अपघात घडवून आणला नाही ना? खरातच्या निकटवर्तीयाचा मृत्यू; रोहित पवार, सुषमा अंधारेंना संशय, खळबळजनक दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
Gold : 2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले,अक्षय तृतीयेपूर्वी सोन्यात चढ-उतार; पुढे काय होणार, मोतिलाल ओसवालचा अहवाल काय सांगतो?
2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले, पुढं काय होणार,मोतिलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचा अहवाल काय सांगतो?
Embed widget