एक्स्प्लोर

Health Tips: चपाती की भात? दोघांमधील शरीरासाठी जास्त फायदेशीर काय?

Health Tips: निरोगी राहण्यासाठी चपाती आणि भात हे दोन्ही आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. पण या दोघांपैकी जास्त फायदेशीर काय? जाणून घेऊया.

Health Tips: भात (Rice) आणि चपाती (Roti) या दोन्ही गोष्टींचा आपल्या रोजच्या जेवणात समावेश असतो. या दोन्हींमधून आपल्याला ऊर्जा मिळते. पण चपाती आणि भात यामधील आरोग्यासाठी अधिक चांगलं काय? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? 

भात हे जगभरात सर्वाधिक खाल्लं जाणारं अन्न (Food) आहे. तर चपाती हा एक भारतीय ब्रेडचा प्रकार आहे. गव्हाच्या पिठापासून किंवा इतर धान्याच्या पिठापासून चपाती बनवता येते. याच प्रकारे तांदूळही विविध प्रकारांत उपलब्ध असतो. तर आता चपाती आणि भात यापैकी आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर काय? हे जाणून घेऊया.

भात आणि चपातीत कॅलरीजचं प्रमाण जवळपास सारखंच असतं, म्हणजेच दोन्ही खाल्ल्याने जवळपास समान कॅलरीज मिळतात. परंतु मधुमेही रुग्णांसाठी वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करताना कॅलरीजवर जास्त लक्ष देणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही एका दिवसात किती कॅलरीज घेत आहात, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.

पोषणतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, कार्बोहायड्रेट खाल्ल्याने वजन वाढत नाही. शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासोबतच ते चरबीचं पचन करण्यास मदत करतात. सर्व प्रकारचे धान्य, ब्राऊन राईस आणि मसूर चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. आपल्या दैनंदिन आहारात कमीतकमी 60 टक्के कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असले पाहिजे.

भात फायदेशीर की चपाती?

जर आपण चपाती आणि तांदळातील कार्ब्सबद्दल बोलायचं झालं तर तांदूळ पॉलिश करताना फायबर काढून टाकले जाते, यामुळे खराब कार्ब्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे जास्त भात खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिन वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. तथापि, तांदळामध्ये असलेले अमाइलोपेक्टिन  (Amylopectin) पचण्यास सोपे आहे आणि त्यामुळे ते बाळांसाठी एक चांगला पर्याय बनते.

त्याच वेळी, भातापेक्षा चपातीमध्ये अधिक पोषक तत्वं आढळतात. चपातीत फॉस्फरस आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळतात. प्रोटिन्सच्या संख्येबद्दल बोलताना, दोन्हीमध्ये ते जवळजवळ समान प्रमाणात आढळतात.

या गोष्टींवर लक्ष द्या

रोटी आणि भात दोन्ही आरोग्यदायी आहेत. या दोन्हींमधून शरीराला ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्त्वं मिळतात. पण तुम्ही चपात्यांची संख्या आणि तांदळाचं प्रमाण लक्षात ठेवावं. अर्धा वाटी भात आणि चार चपात्या खाणं हा उत्तम पर्याय आहे. तांदळात ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्याने ते जास्त खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते.

हेही वाचा:

Health Tips : सफरचंद आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या ते खाण्याची योग्य वेळ कोणती?

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदाMuddyache Bola Amaravati| बडनेराचा गड राणा दाम्पत्य राखणार की नवीन चेहऱ्याला संधी मिळणार?Pankaja Munde : महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे' घोषणांची गरज नाही : पंकजा मुंडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Sharad Pawar In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
'ऑडी' इंडियाकडून नवीन लॅव्हिश ऑडी क्‍यू 7 चं बुकिंग सुूरू, लाँचिंगची तारीख ठरली; ताशी 250 चा हायस्पीड
'ऑडी' इंडियाकडून नवीन लॅव्हिश ऑडी क्‍यू 7 चं बुकिंग सुूरू, लाँचिंगची तारीख ठरली; ताशी 250 चा हायस्पीड
Embed widget