एक्स्प्लोर

कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'

Akshay Kumar cancer awareness: अक्षय कुमारने एका कार्यक्रमात पुरुष वर्गामध्ये कॅन्सरबाबत जनजागृती केली आहे.

Akshay Kumar prostate cancer awareness: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. काही चित्रपटातून तो समाजाला संदेश देण्याचाही प्रयत्न करतो.  केवळ चित्रपट नाही तर, जाहिरातींमधूनही तो प्रेक्षकांमध्ये आरोग्याच्या निगडीत जनजागृती पसरवत असतो. थिएटरमध्ये शो सुरु होण्यापूर्वी अक्षय कुमारची नो स्मोकिंग अॅड आपण सर्वांनीच पाहिली असेल.  दरम्यान, अलिकडेच अक्षय कुमारने एका इव्हेंटमध्ये पुरुषांमध्ये कॅन्सरबाबत जनजागृती केली आहे. अभिनेत्यानं पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगाबाबत माहिती दिली. तसेच सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत करण्यासाठी  नियमित PSA (प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजन) टेस्ट करण्याची माहितीही त्यानं दिली.   

वडिलांची आठवण काढत अक्षय कुमार झाला भावुक

अक्षय कुमार अलिकडेच इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात सहभागी झाला होता.  त्यावेळी सेशनच्या एका मॉडरेटरने सांगितले की, तो प्रोस्टेट कॅन्सर या आजारातून बरा झाला. यावेळी त्यानं वडिलांबाबत माहिती दिली. वडिलांबाबत माहिती देताना अक्षय कुमार भावुक झाला होता.  अक्षय कुमार म्हणाला की, त्याला असे वाटते की त्याच्या वडिलांना गमावण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे, त्याला 50 - 55  वयानंतर प्रोस्टेट स्पेसिफिक एंटिजन टेस्टचे महत्त्व माहित नव्हते.  जे प्रोस्टेट कर्करोगाचे निदान करण्यास मदत करते.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमार यावेळेस इमोशनल झाला आणि म्हणाला, 'मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती, माझ्या वडिलांना गमावले आहे. 67 व्या वर्षी ते आम्हाला सोडून गेले. माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व होते. कारण मला ठाऊक नव्हते की, 50- 55 वयात PSA टेस्ट करायला हवे', असं त्यानं म्हटलं.  'मी उपस्थित सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छित आहे की, पुरुषांनी दरवर्षी PSA टेस्ट  करणे खूप गरजेचं आहे, हे आम्हाला आधी ठाऊक नव्हते. जर लवकर निदान झाले तर, आमचा जीव वाचू शकतो'.

'प्रोस्टेट कर्करोग  खूप सामान्य आहे. तीनपैकी एका पुरुषाला प्रोस्टेट कॅन्सर  होण्याचा धोका असतो. त्यामुळे कृपया टेस्ट करा.  हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे केवळ स्वत:चे जीवन नाही तर, संपूर्ण कुटुंबाचे जीवन वाचवू शकता', असं अक्षय कुमार म्हणाला. मिळालेल्या माहितीनुसार,  अक्षय कुमारचे वडील हरी ओम भाटिया यांना 2000 साली प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले होते. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget