एक्स्प्लोर

Health Tips : सततच्या आवाजामुळे श्रवण क्षमता कमकुवत होण्याचा धोका; तज्ज्ञांनी दिला इशारा

Health Tips : ट्रॅफिक आणि उत्सवांच्या आवाजामुळे श्रवण समस्येचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Health Tips : वाढते शहरीकरण आणि त्याचबरोबर वाढलेली ट्राफिक, नव्याने सुरू असलेली बांधकामे आणि उत्सवांदरम्यान होणारा मोठा आवाज यामुळे पुण्यासारख्या शहरांमध्ये ध्वनी प्रदूषण हा दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. परंतु या सततच्या आवाजाचा कानांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. ट्राफिकमुळे हॅार्नचा वाढता वापर, लाऊडस्पीकर, फटाके आणि बांधकाम यंत्रसामग्रीच्या मोठ्या आवाजाच्या सतत संपर्कात राहिल्याने कालांतराने श्रवणशक्ती कमकुवत होण्याचा धोका वाढतो.

तज्ञांच्या मते, श्रवणशक्ती कमी होणे अनेकदा हळूहळू विकसित होत असल्यामुळे सुरुवातीच्या लक्षणांकडे लोक दुर्लक्ष करतात. मोठ्या आवाजाच्या सततच्या संपर्कामुळे कानाच्या आतील नाजूक पेशींवर परिणाम होतो. या पेशी आवाज स्पष्टपणे ऐकू येण्यासाठी महत्त्वाच्या असतात; परंतु वारंवार मोठ्या आवाजाच्या संपर्कामुळे त्या खराब होऊ शकतात.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ईएनटी तज्ज्ञ डॉ. अभिजित मंत्री यांनी सांगितले की, वाहतुकीचा आवाज, बांधकाम यंत्रसामग्री, तसेच उत्सव किंवा कार्यक्रमांदरम्यान लाऊडस्पीकर आणि फटाक्यांच्या वापरामुळे लोक कानांच्या सहनशक्तीपेक्षा जास्त आवाजाच्या पातळीला सामोरे जातात. कालांतराने या सततच्या आवाजामुळे श्रवणशक्तीवर परिणाम होऊन श्रवण क्षमता कमी होण्याची समस्या उद्भवू शकते.बऱ्याचदा श्रवणशक्ती अचानक कमी होत नाही, तर ती हळूहळू कमी कमी होत जाते. अलीकडे श्रवण समस्यांसाठी रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांमध्ये सुमारे 40 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येत आहे. विशेषतः 25 ते 79 वयोगटातील व्यक्तींना गर्दीच्या ठिकाणी संभाषण स्पष्ट ऐकण्यात अडचण येणे, लोकांनी सांगितलेले पुन्हा पुन्हा विचारणे, टीव्ही किंवा मोबाईलचा आवाज वाढवणे, कानात विशिष्ट आवाज किंवा काहीतरी वाजण्याचा आवाज (टिनिटस) येणे, तसेच समोरची व्यक्ती अस्पष्ट बोलत आहे असे वाटणे अशी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास उपचारास विलंब होतो आणि समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

डॉ. मंत्री पुढे म्हणाले की, श्रवण समस्यांचे निदान ईएनटी तज्ज्ञ किंवा ऑडिओलॉजिस्टद्वारे केलेल्या ऑडिओमेट्रीसारख्या साध्या श्रवण चाचण्यांद्वारे करता येते. वेळीच निदान झाल्यास श्रवणशक्ती कमी होण्याचा प्रकार आणि त्याची तीव्रता ओळखणे सोपे होते. परिस्थितीनुसार उपचारांमध्ये कानाच्या संसर्गासाठी औषधे, श्रवणयंत्रे, स्टिरॉइड थेरपी किंवा इतर सहाय्यक उपचारांचा समावेश केला जाऊ शकतो.

तज्ज्ञांनी श्रवणसंवर्धनासाठी काही सोप्या उपायांचे पालन करण्याचेही आवाहन केले आहे. यामध्ये उत्सव किंवा कार्यक्रमांदरम्यान लाऊडस्पीकरच्या अगदी जवळ उभे राहणे टाळावे, अतिशय गोंगाटाच्या वातावरणात इअरप्लग किंवा नॉइज-कॅन्सलिंग हेडफोन्स वापरणे,हेडफोन्स व संगीत उपकरणांचा आवाज सुरक्षित पातळीवर ठेवणे, सतत गोंगाट असलेल्या वातावरणात राहण्याऐवजी मधूनमधून शांत जागी विश्रांती घ्यावी.

तज्ज्ञांच्या मते, ध्वनी प्रदूषण हे शहरी जीवनाचा एक सामान्य वाटत असला तरी त्याचा श्रवण क्षमतेवर होणारा परिणाम दुर्लक्षित करता कामा नये. नियमित श्रवण तपासणी हा सुरुवातीची लक्षणं ओळखण्यास मदत करते. प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केल्यास आपली श्रवणशक्ती दीर्घकाळ सुरक्षित ठेवता येते.

- डॉ. अभिजित मंत्री - अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय ईएनटी तज्ज्ञ 

हे ही वाचा : 

Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget