एक्स्प्लोर

Ali Larijani Death :  लारीजानींचा मृत्यू, इराणची सूत्रं आता कोणत्या नेत्यांकडे? Special Report

एकीकडे क्षेपणास्त्र साठ्यांना लक्ष्य करत असताना इस्रायल-अमेरिकेनं इराणच्या नेत्यांना टार्गेट करणं सुरूच ठेवलंय... आतापर्यंत काही डझन राजकीय आणि लष्करी नेत्यांना ठार केल्यानंतरही इराणचा आत्मविश्वास अढळ आहे. मात्र काल असा एक नेता मारला गेलाय, की त्यामुळे युद्धाच्या भवितव्याचीच चर्चा सुरू झालीये... कोण आहे हा नेता आणि त्याच्या मृत्युमुळे युद्ध कसं वेगळं वळण घेऊ शकतं, याचं विश्लेषण करणारा हा स्पेशल रिपोर्ट बघुयात... 

इस्रायलच्या हल्ल्यात इराणी राजवटीचा 'वजीर' ठार

((इराणमध्ये एखादा फुटलेला बॉम्ब आणि अली लारीजानीचा फोटो.. मोन्ताज स्टाईल ट्रीटमेंट))

अली लारीजानींच्या मृत्यूचा इराण घेतोय बदला...

 ((अली लारीजानी फोटो, आणखी काही हल्ल्याचे व्हिज्युअल्स... मोन्ताज स्टाईल ट्रीटमेंट)) 

इस्रायलच्या राजधानीवर आजवरचा सर्वात मोठा हल्ला... 
((आज इराणनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे बेस्ट व्हिज वापरातेल अविवमधील हल्ला, स्फोटाचे व्हिज.. मोन्ताज स्टाईल ट्रीटमेंट)) 

<<मोंटाज आऊट>>

इराणची राजधानी तेहरानवर मंगळवारी पुन्हा जोरदार हल्ला झाला... 

यात इराणी राजवटीतले तीन मोठे मोहरे इस्रायलनं टिपले.. 

<<फुल फ्रेम फोटोवर ठार असा शिक्का मारा >>

इराणी काऊंसिलचे उपाध्यक्ष रजा बियात... 

बासीज प्रांताचे कमांडर गुलामरेजा सुलेमानी... 

आणि 

इराणचे संरक्षण प्रमुख अली लारीजानी... 

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्यासह अनेक मोठे नेते आतापर्यंत मारले गेलेत... 

मात्र लारीजानी यांचा मृत्यू हा इराणी राज्यकर्त्यांवर सर्वात मोठा आघात मानला जातोय... 

त्यामुळेच या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणनं इस्रायलची राजधानी तेल अविवला लक्ष्य केलं... 

रात्रीच्या वेळी इराणनं मोठ्या संख्येनं क्षेपणास्त्रं डागली... 

इस्रायलच्या 'आयर्न डोम'नं यातील बरीचशी क्षेपणास्त्रं नष्ट केली खरी...

मात्र काही सुपरसॉनिक मिसाईल्स हे हवाई सुरक्षा भेदून जमिनीवर कोसळली... 

क्षेपणास्त्रांच्या या लाटेत ६० पेक्षा जास्त इस्रायलींचा बळी गेल्याचा दावा इराणनं केलाय... 

लारीजानी मारले गेले असले, तरी त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचा दावा इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी केला...  

GFX IN 

लारीजानींच्या मृत्यूमुळे इराणचा दृढनिश्चय कमी होणार नाही. एका व्यक्तीच्या जाण्यानं सगळी यंत्रणा कोलमडून पडत नाही. अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतरही सगळं व्यवस्थित सुरू आहे. इराणची राजकीय यंत्रणा मजबूत आहे, अशी प्रतिक्रिया अराघची यांनी दिलीये. 

GFX OUT 

बाईट -- शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक
((Z:1803MUMBAIdeolankar byte))

आता यात काहीसं तथ्य असलं आणि खामेनी मारले गेल्यावर इराणला फरक पडला नाही, हे दिसलं असलं तरी... 

लारीजानी यंत्रणेत नसल्याचा जास्त परिणाम होऊ शकतो, असं मानलं जातंय...

MID PTC 

((लष्करी अधिकारी नसतानाही इराणच्या 'पॉलिटिकल हायरारकी'मध्ये अली लारीजानींचं स्थान खूप वरचं होतं... 'सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काऊंसिल'चे सचिव या नात्यानं त्यांचा यंत्रणेत दबदबा होता... लष्करी आणि परराष्ट्र धोरणांमध्ये त्यांच्या शब्दाला किंमत होती... विशेषतः युद्ध सुरू झाल्यानंतर लारीजानी यांची धोरण आणि अचुक रणनीतीचा इराणला प्रचंड फायदा झाल्याचंही मानलं जातंय... ))

इराणचा हा 'वजीर' मारला गेल्यानंतर त्याचा युद्धावर परिणाम काय होणार याबाबत परस्परविरोधी दावे केले जातायत... 

<<GFX IN>>

यातला पहिला मतप्रवाह आहे लारीजानींच्या मृत्यूमुळे इराण बॅकफुटवर जाईल आणि युद्ध लवकर संपेल हा... 

अमेरिका-इस्रायलविरोधी संघर्ष निर्णायक वळणावर असताना लारीजानींची कमतरता इराणला भासेल... 

होर्मुसची कोंडी करण्याची रणनीती अधिक प्रभावीपणे राबवणारा दुसरा नेता इराणकडे नसल्याचं मानलं जातंय... 

सरकार, लष्कर आणि धर्मसंस्थेमध्ये समतोल साधण्याची कला लारीजानी यांना अवगत होती... 

त्यांच्या पश्चात इराणमधल्या या तीन प्रभावी संस्थांमध्ये प्राबल्याची लढाई सुरू होऊ शकेल, असं तज्ज्ञांना वाटतंय... 

तर लारीजानींच्या मृत्यूमुळे युद्ध लांबेल, असं मानणाराही तज्ज्ञांचा एक गट आहे... 

कमालीचे मूलतत्ववादी वाटत असले, तरी लारीजानी हे इराणच्या नेतृत्वात सर्वात व्यवहारी मानले जात... 

त्यामुळे अमेरिका-इस्रायलसमोर वाटाघाटींची वेळ आलीच, तर ते शस्त्रसंधीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकले असते... 

इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अमेरिकेशी अनौपचारिक पातळीवर चर्चाही लारीजानींच्या मृत्युमुळे थांबल्याचं मानलं जातंय... 

<<GFX OUT>>

सर्वोच्च नेता किंवा राष्ट्राध्यक्ष अशा पदांवर नसले तरी लारीजानी इराणचे 'अप्रत्यक्ष नेते' मानले जात... 

त्यांच्या पश्चात आता इराणची राजकीय सूत्रं पाच जणांमध्ये विभागली जाण्याची शक्यताय... 

<<GFX IN>>

अलिकडेच सर्वोच्च नेतेपदी निवड झालेले मोजतबा खामेनी... 

राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन... 

रिव्हॉल्युशनरी गार्डचे नवनियुक्त प्रमुख अहमद वाहिदी... 

इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ... 

आणि न्यायपालिकेचे प्रमुख गुलाम-हुसेन मोहसेनी... 

<<GFX OUT>>

इस्रायलच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लारीजानी यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार झाले... 

कोणत्याही क्षणी हवाई हल्ल्याची भीती असतानाही हजारो इराणी नागरिक यावेळी रस्त्यावर उतरले... 

इराण सरकार आणि जनतेवर लारीजानी यांचा किती प्रभाव होता, हे सिद्ध करायला ही गर्दी पुरेशी आहे... 

ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. 

कडे? Special Report

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Embed widget