एक्स्प्लोर

Earphones And Ear Damage: मोठ्या आवाजात हेडफोनमध्ये म्युझिक ऐकताय? तरुणांच्या श्रवणशक्तीवर होतोय गंभीर परिणाम, वाचा तज्ञांचा सल्ला

Earphones And Ear Damage: २०-३० वयोगटातील १० पैकी ६ तरुणांना श्रवणविषयक तक्रारी; मोठ्या आवाजात इअरफोनचा वापर टाळण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई :- हेडफोन आणि इअरफोनचा वाढता वापर तरुणांच्या श्रवणशक्तीवर दुष्परिणाम करत आहे. वारंवार इअरफोनचा वापर, जास्त वेळ डिजिटल उपकरणांवर घालवणे आणि शहरांमध्ये वाढलेली आवाजाची पातळी यामुळे २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये श्रवणविषयक समस्या वाढत आहेत. योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास ही समस्या पुढे जाऊन कायमस्वरूपी श्रवणशक्ती कमी होण्याचे मुख्य कारण ठरू शकते. आजच्या डिजिटल युगात अनेक तरुण दररोज कामाच्या ठिकाणी, संगीत फावल्या वेळेत तसेच प्रवासात संगीत ऐकण्यासाठी, गेमिंग किंवा ऑनलाइन कंटेंट पाहण्यासाठी तासन्‌तास इअरफोनचा वापर करतात. मात्र सतत मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्याने कानांना विश्रांती मिळत नाही. यामुळे कानाच्या आतील संवेदनशील संरचनेवर परिणाम होऊन श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो.

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल येथील कान, नाक, घसा विकार तज्ज्ञ डॉ. अंकित जैन म्हणाले, इअरफोन्स हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग ठरला आहे, परंतु त्याच्या जास्त आवाजामुळे कालांतराने श्रवणशक्तीला हानी पोहोचू शकते. आपल्या कानाच्या आतील भागात नाजूक संवेदी पेशी असतात ज्या मेंदूसाठी ध्वनीच्या माध्यमातून  सिग्नल पोहोतवणाचे काम करतात. मोठ्या आवाजाच्या सततच्या संपर्कामुळे या पेशींचे कायमचे नुकसान होऊ शकते आणि एकदा त्या प्रभावित झाल्या की त्या पुन्हा निर्माण होऊ शकत नाहीत. दरमहा, २०-३० वयोगटातील जवळजवळ ६०% व्यक्तींना हेडफोन्सचा दीर्घकाळ वापर आणि मोठ्या आवाजाच्या वारंवार संपर्कामुळे श्रवण क्षमता कमी झाल्याची लक्षणं दिसून येतात.

डॉ. जैन  पुढे सांगतात की, १० पैकी ६ तरुण कानात सतत आवाज येणे (टिनिटस), संभाषण स्पष्ट ऐकू न येणे किंवा मोबाईल-लॅपटॉपवरील आवाज वारंवार वाढवण्याची गरज भासणे अशा तक्रारी नोंदवतात. अशा सवयी दीर्घकाळ आढळल्यास भविष्यात कायमस्वरूपी श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका वाढू शकतो.

शहरी वातावरणातील वाढत्या आवाजाच्या पातळीमुळेही ही समस्या तीव्रतेने वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. वाढता ट्राफिक, सुरु असलेली बांधकामे आणि सार्वजनिक ठिकाणांवरील गोंगाट यामुळे बरेचजण कामातील हेडफोन्सचा आवाज वाढवतात, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या कानांवर होतो.

डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलच्या ईएनटी सर्जन डॉ. नेहा पंगम म्हणाल्या, सध्या दरमहा २० ते ३० वयोगटातील सुमारे ४० टक्के तरुणांमध्ये श्रवणविषयक समस्यांची सुरुवातीची लक्षणे दिसू आली आहेत. कानात आवाज येणे, गर्दीत स्पष्ट ऐकू न येणे, वारंवार लोकांना पुन्हा बोलण्यास सांगावे लागणे, कानात दाब जाणवणे किंवा फोनवरील आवाज सतत वाढवावा लागणे अशा तक्रारी वाढत आहेत. हे तरुणांमधील श्रवण क्षमतेसंबंधीत समस्या वाढल्याचे स्पष्ट करते.

तज्ज्ञांच्या मते, श्रवणक्षमता चांगली रहावी याकरिता चांगल्या सवयी अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. इअरफोनचा आवाज मध्यम पातळीवर ठेवणे, सलग काही  हेडफोन्सचा वापर टाळणे, अधुनमधुन विश्रांती घेणे, गोंगाट असलेल्या जागी संरक्षणात्मक उपाय करणे यामुळे श्रवणशक्तीचे संरक्षण करता येते. तसेच इअरफोनचा जास्त वापर करणाऱ्यांनी नियमित श्रवण तपासणी करून घेणे गरजेचे आहे.  डॉक्टरांच्या मते, तरुण पिढीने विशेष सावधगिरी बाळगली नाही तर भविष्यात श्रवणशक्ती कमी होण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे तुमच्या श्रवण क्षमतेच्या बाबतीत निरोगी सवयी अंगीकारणे आणि कानांच्या समस्येकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget