एक्स्प्लोर

Ashok Kharat : रुपाली चाकणकर एक नंबरच्या खोटारड्या, अशोक खरातचं कांड एका वर्षापूर्वीच त्यांना माहिती; सुषमा अंधारेंनी पत्रच दाखवलं

Sushma Andhare On Rupali Chakankar : मार्च 2025 मध्ये एका स्थानिक वृत्तपत्राने अशोक खरातवर महिलेचे शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यावर रुपाली चाकणकरांनी त्या वृत्तपत्राकडून माफीनामा घेतल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केला. 

मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे (Ashok Kharat) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. अशोक खरातांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत आपल्याला काही कल्पना नसल्याचं चाकणकर म्हणाल्या होत्या. त्यावर आता ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) एका वृत्तपत्राचं पत्र समोर आणलं आहे. त्यामध्ये अशोक खरातशी संबंधित महिला शोषणाचा आणि रुपाली चाकणकरांच्या एका पत्राचा उल्लेख असल्याचं दिसतंय. 

अशोक खरातच्या कांडासंबंधी बातमी देणाऱ्या वृत्तपत्राकडून रुपाली चाकणकरांनी माफीनामा लिहून घेतला होता असा दावा सुषमा अंधारेंनी केला आहे. रुपाली चाकणकरांना जर खरातच्या प्रकरणासंबंधी काही माहिती नाही तर त्यांनी एका वर्षापूर्वी वृत्तपत्राकडून माफीनामा कसा घेतला असा प्रश्नही सुषमा अंधारेंनी विचारला.

Rupali Chakankar Letter : रुपाली चाकणकरांच्या पत्रात काय? 

सुषमा अंधारे यांनी एका स्थानिक वृत्तपत्राचं पत्र शेअर केलं आहे. त्या स्थानिक वृत्तपत्राने रुपाली चाकणकरांना ते पत्र लिहिलं होतं. गेल्या वर्षी 19 मार्च, म्हणजे बरोबर एका वर्षापूर्वीचं ते पत्र आहे. संबंधित वृत्तपत्राने अशोक खरातने केलेल्या महिलेच्या शोषणाची पोलखोल करणार असल्याची बातमी दिली होती. त्यानंतर रुपाली चाकणकरांनी त्या वृत्तपत्राला ती मोघम माहितीवर आधारित बातमी असल्याचं म्हटलं होतं असा दावा त्या पत्रातून करण्यात आल्याचं दिसतंय. तसेच अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांनी तत्परता दाखवून पत्र लिहिलं, त्यांना महिलांचा कळवळा असल्यांचा टोलाही त्या स्थानिक वृत्तपत्राने लगावल्याचं दिसतंय. 

Sushma Andhare On Rupali Chakankar : काय म्हणाल्या सुषमा अंधारे? 

रूपाली चाकणकर क्रमांक एकच्या खोटारड्या आहेत.  कॅप्टन अशोक खरात काय लायकीचा माणूस आहे हे रूपाली चाकणकर यांना चांगलेच माहिती होते. खरात याची दुष्यकृत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न एका स्थानिक वृत्तपत्राने केला तेव्हा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत त्याच्याकडून चाकणकर बाईंनी माफीनामा घेतला. 

ज्या चाकणकर बाई मला या प्रकरणाची माहिती नव्हती असं सांगत आहेत त्या बाई या माफीनाम्याच्या संबंधाने काय बोलणार आहेत? 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आपल्या पक्षाच्या प्रतिमेची फार काळजी असेल तर तटकरेंनी सांगावं, "पीडित महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचेच चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, कधी वैष्णवी हगवणे कधी तनिषा दिसे तर कधी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत साततात्याने वादग्रस्त ठरलेल्या चाकणकर यांना महिला आयोगावर ठेवण्यात पक्षाची कोणती राजकीय अपरिहार्यता आहे? 

टीप: वृत्तपत्राने दिलेले सदरील माफीनामा पत्र बघता रूपाली चाकणकरांना या खरात प्रकरणाची संपूर्ण माहिती एक वर्ष आधीपासूनच होती मात्र याच्या मुळाशी जाण्यापेक्षा पिढीचांवरच आणि पिढी त्यांना न्याय देणाऱ्यांवरच दबाव आणण्यात चाकणकरांनी धन्यता मानली हे विशेष आहे.

Rupali Chakankar On Ashok Kharat : काय म्हणाल्या होत्या रुपाली चाकणकर? 

दरम्यान, अशोक खरातचे कांड समोर आल्यानतंर त्यावर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली. कॅप्टन खरातांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील, पोलिस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget