एक्स्प्लोर

Ashok Kharat : 'कॅप्टन'चे अश्लील खेळ उघड! धार्मिक विधीच्या नावाखाली रंगबाजी, भोंदूबाबा अशोक खरातच्या कांडामुळे खळबळ

Ashok Kharat Case : नाशिकमध्ये भोंदू मांत्रिक अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक झाली असून त्याचे 58 व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे.

नाशिक : भविष्य जाणून घेण्यासाठी बडे बडे नेते, सेलिब्रिटी त्याच्या दरबारात हजेरी लावायचे.. त्याचा प्रभाव एवढा होता की  काही जण तर चक्क त्याचे पायही धुवायचे. पण आता त्याचा पर्दाफाश झाला. तो नुसता भोंदू मांत्रिक नाही, तर त्याच्यात वासनांध सैतानाही दडलाय. नाशिकच्या कॅनडा कॉर्नरसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये, कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातनं (Ashok Kharat) त्याचं दुकान थाटलं होतं. आपल्याच कार्यालयात महिलेवर लैंगिक अत्याचार करताना हा विकृत भोंदूबाबा कॅमेऱ्यात कैद झाला. पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर या भोंदू मांत्रिकाची कुंडली जगासमोर आली. त्यामुळे वासनांध मांत्रिकाबरोबरच, त्याच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या नेत्यांचीही अडचण वाढल्याचं दिसतंय. 

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने धार्मिक विधीच्या नावाखाली आधी जाळ्यात ओढले आणि नंतर गुंगीचे औषध देत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ashok Kharat Crime Exposure : सीसीटीव्हीमुळे भोंदूबाबाचा पर्दाफाश

या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अशोक खरातचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आरोपी धार्मिक विधीचा बहाणा करत महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवतो आणि त्यानंतर गैरवर्तन करतो, असं दिसून येते. हा व्हिडीओ अत्यंत आक्षेपार्ह असल्याने तो सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

Ashok Kharat Case Investigation : 58 व्हिडीओ पोलिसांच्या हाती

तपासादरम्यान पोलिसांच्या हाती 58 व्हिडीओ लागले असून त्यामध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओंच्या आधारे आरोपी ब्लॅकमेल करत होता का किंवा वारंवार अत्याचार करत होता का, याचा तपास सुरू आहे.

Ashok Kharat Case Political Angle : नेत्यांच्या अडचणी वाढल्या

या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांच्या पाद्यपूजेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे, तसेच राधाकृष्ण विखे पाटील आणि दीपक केसरकर यांनीही खरातच्या दरबाराला भेट दिल्याचे समोर आले आहे.

Rupali Chakankar On Ashok Kharat Case : चाकणकरांची प्रतिक्रिया 

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रूपाली चाकणकर म्हणाल्या की, “शिवनिका ट्रस्टच्या सामाजिक कार्यामुळे आम्ही जोडले गेलो होतो. खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा आरोपांबाबत मला माहिती नव्हती. पोलीस योग्य तो तपास करत असून त्यांच्या तपासावर माझा विश्वास आहे.”

Who Is Ashok Kharat : कोण आहे अशोक खरात?

सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील शिवनिका ट्रस्टचा अध्यक्ष

मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षे सेवा

154 देशांचा प्रवास

स्वतःला अंकतज्ज्ञ म्हणून सादर करत दरबार भरवायचा

नेते, सेलिब्रिटी, उद्योजक यांची वर्दळ

Ashok Kharat Political Relations : भोंदूबाबांबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर भोंदूबाबांच्या वाढत्या प्रभावाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तीही अशा व्यक्तींच्या संपर्कात असल्याचे उघड झाल्याने समाजात संताप व्यक्त केला जात आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Palghar And Nashik Earthquake: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जुन्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार?, भूकंपरोधक घरकुलांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जुन्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार?, भूकंपरोधक घरकुलांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
Nashik Crime News: नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Embed widget