Rheumatoid Arthritis : संधिवातासाठी वय जबाबदार नाही तर, 'या' गोष्टींमुळे वाढतो संधिवाताचा त्रास; वाचा लक्षणं आणि उपचार
Rheumatoid Arthritis : संधिवात ही वाढत्या वयाबरोबर उद्भवणारी समस्या असली तरी, संधिवाताचा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो.
Rheumatoid Arthritis : संधिवात (Arthritis) हा सांध्याशी संबंधित स्वयंप्रतिकार रोग आहे. संधिवात हा शब्द दोन शब्दांनी जोडला गेला आहे. एक म्हणजे संधी आणि दुसरा वात. संधी म्हणजे जॉइंट. आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा जॉइंट दुखत असेल सूज येत असेल तर आपण त्याला संधिवात आहे असं म्हणू शकतो. ऑटो इम्यून रोगामध्ये, शरीर स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्तीवर आणि शरीराच्या निरोगी पेशींवर आक्रमण करू लागते. त्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होऊ लागते आणि अनेक आजार सुरु होतात.
संधिवात ही वाढत्या वयाबरोबर उद्भवणारी समस्या असली तरी, संधिवाताचा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो. या रोगावर जितक्या लवकर उपचार घेतले जातील तितके चांगले आहे. पुरुषांपेक्षा स्त्रिया या आजाराला अधिक बळी पडतात. संधिवाताचा केवळ सांध्यांवरच परिणाम होतो असं नाही, तर या समस्येचा परिणाम त्वचा, डोळे, फुफ्फुस, हृदय आणि रक्तवाहिन्यांवरही दिसून येतो. चालताना त्रास होण्याबरोबरच हाडं फ्रॅक्चर होण्याचाही धोका असतो.
'या' कारणांमुळे संधिवाताचा धोका वाढू शकतो
तसं पाहायला गेलं तर संधिवाताचा धोका वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. यापैकी काही प्रमुख कारणं आपण जाणून घेऊयात.
महिलांमध्ये जास्त प्रमाण : स्त्रियांना संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते, कारण हा रोग होण्यास हार्मोनल बदल देखील जबाबदार असतात, ज्यामुळे स्त्रियांवर त्याचा जास्त परिणाम होतो.
धूम्रपान : जास्त प्रमाणात सिगारेट आणि मद्यपान केल्याने केवळ कर्करोग होण्याचा धोका वाढत नाही. खरंतर, यामुळे संधिवात देखील होऊ शकतो. यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास परिस्थिती गंभीर होऊन रोग बरा होणे फार कठीण जाते.
लठ्ठपणा : सतत वाढणारं वजन हे देखील संधिवाताचं प्रमुख कारण आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र, वाढत्या वजनामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब सारखे आजारही होऊ शकतात.
अनुवांशिक : काही लोकांमध्ये अनुवंशिकरित्याही संधिवाताचा त्रास असतो.
संधिवाताची लक्षणे कोणती?
- हाताच्या सांध्यांना विशेषतः बोटांना दुखणे आणि सूज येणे
- पायाचे सांधे आणि गुडघे दुखणे
- ताप येणे
- अशक्तपणा जाणवणे
- वाढत्या वयाबरोबर हाडं ठिसूळ होतात.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )