Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या
Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. ज्यामध्ये हार्मोन्स महत्त्वाची भूमिका बजावतात.
Pregnancy Health Issues : प्रत्येक महिलेसाठी गर्भधरणेचा काळ हा सर्वात सुखाचा आणि अविस्मरणीय क्षण असतो. मात्र, हा काळ तितकाच आव्हानात्मक देखील असतो. या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. ज्यामध्ये हार्मोन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा वेळी महिला शारीरिकदृष्ट्या अशक्त होतात. त्यांच्यात अशक्तपणाची कमतरता सतत जाणवत असते. आणि त्यामुळे अनेक आजारांचा धोका देखील तितकाच वाढतो. यामुळेच महिलांना गरोदरपणात स्वतःची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून आई आणि बाळ दोघांचंही आरोग्य चांगलं राहील. गरोदरपणात महिलांना कोणत्या आजारांचा सर्वात जास्त धोका असतो या सदंर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
गर्भधारणे दरम्यान होणारा मधुमेहाचा त्रास
गर्भवती महिलांना मधुमेहाचा धोका खूप जास्त असतो. गरोदरपणात होणाऱ्या मधुमेहाला गर्भावस्थेतील मधुमेह म्हणतात. उच्च रक्तातील साखरेची पातळी गर्भवती महिला आणि गर्भातील बाळ दोघांसाठीही घातक ठरू शकते. हे टाळण्यासाठी, नियमित तपासणी करा. गरोदरपणात आहाराची विशेष काळजी घ्या. याशिवाय तणाव टाळण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम करत राहा.
अशक्तपणा (Weakness)
गर्भधारणेदरम्यान रक्ताची कमतरता, हिमोग्लोबिनची कमतरता किंवा अशक्तपणा यांसारख्या सामान्य समस्या अनेक महिलांना जाणवतात. गरोदरपणात शरीराला रक्ताची खूप गरज असते. जेव्हा शरीरात पुरेसे रक्त तयार होत नाही, तेव्हा अॅनिमियाची समस्या उद्भवू शकते. हा एक धोकादायक आजार आहे, जो भविष्यात आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी चांगला मानला जात नाही.
थायरॉईड (Thyroid)
गर्भवती महिलांना थायरॉईडचा धोकाही खूप जास्त असतो. गर्भधारणेदरम्यान थायरॉईड ग्रंथी वाढते. त्यामुळे हार्मोन्सची पातळी असंतुलित होते. यामुळे आई आणि बाळ दोघांनाही त्रास होऊ शकतो.
यूटीआय (UTI)
गर्भधारणेदरम्यान मूत्रमार्गाशी संबंधित समस्या वाढू शकतात. गर्भवती महिलांमध्ये गर्भाशयाचे संक्रमण सामान्य आहे. अशा वेळी गर्भवती महिलांनी आपल्या अंतर्गत भागाची काळजी घ्यावी, ती जागा स्वच्छ ठेवावी. कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.