एक्स्प्लोर

धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न

Nandurbar leopard Attack: वनविभागाचे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करण्यात आल्यानंतर महिलेल्या उत्तरिय प्रक्रियेसाठी तळोद्याच्या शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आले आहे.

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील खुर्चीमाड गावात एक भयंकर घटना घडली आहे. 80 वर्षीय वृद्ध महिला घराबाहेर काही कामासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने या महिलेवर अचानक झडप घातली. (Leopard Attack) बिबट्याने या महिलेवर झडप घालून तिला आपल्या तावडीत ओढून घेत बिबट्याने महिलेवर जोरदार हल्ला करत तिला जवळपास 500 मीटर अंतरावर फरफटत नेले.यात महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला आहे. या हल्ल्यामुळे गावात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करण्यात आल्यानंतर महिलेल्या उत्तरिय प्रक्रियेसाठी तळोद्याच्या शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आले आहे. या महिलेचे नाव गौरेबाई खालेनाईक असे आहे. रात्री एक वाजता हा बिबट्याचा हल्ला झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. रात्री शोधाशोध झाली. गावातले लोक जमा झाले. जंगलात एका ठिकाणी या महिलेचा मृतदेह सापडला. बिबट्याला पकडण्यासाठी सध्या शोधमोहीम राबवली जात आहे.

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

गावकऱ्यांनी प्रशासनाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. या हल्ल्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली असून, त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. गावातील काही लोकांच्या मते, परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन वारंवार होत होते. मात्र, त्यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. परिणामी, हा जीवघेणा हल्ला घडल्याचा ग्रामस्थांनी सांगितलंय. वनविभागाने त्वरित बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे. वनविभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर जाणे टाळण्याचे आणि जंगलाच्या जवळपास फिरण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सतर्क राहून संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित वनविभागाला कळवण्याचेही सांगितले आहे.

नाशिकमध्ये शिवारात बिबट्याचं दर्शन

पंचवटीच्या (panchavati) मखमलाबाद शिवारातील (Makhamalabad Shivar) गंगापूर कालव्यालगत वनविकास सागजडी महामंडळाच्या रोपवाटिकेजवळ भरदिवसा नागरिकांना बिबट्याचे (Nashik Leopard News) दर्शन घडले. यामुळे शेतकरी व परिसरात येणाऱ्या शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात नर व मादी तसेच दोन बछडे असल्याची चर्चा आहे. 

बिबट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मखमलाबाद शिवारातील गंगापूर कालव्यालगत काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे कालव्याच्या रस्त्यावरून ये जा करताना नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी काकड यांच्या मळ्यातील वासराचा बिबट्याने फडशा पाडला होता. कालव्याच्या परिसरात सकाळी- सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी नागरिक येत असतात. 

हेही वाचा:

Pune Crime : आता बाप बाहेर आलाय, मोक्कामधून सुटलेल्या कुख्यात गुंडासाठी येरवडा परिसरात रॅली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
ZP School : जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 09 Jan 2025 : ABP MajhaMaharashtra 12 MLC : 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन ठाकरे गट, मविआला धक्का, हायकोर्टाने याचिका फेटाळलीAaditya Thackeray On Fadanvis Meet :फडणवीसांसोबत बैठकीत काय चर्चा झाली?आदित्य ठाकरेंनी सगळं सांगितलंABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 09 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
ZP School : जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
ट्रॅक्टर चोरी, चंदन चोरी, कुणालाही मारा, आका तुमच्यासोबत; आका शंभर टक्के 302 चा आरोपी, जल्लाद फाशी देईल तेव्हा तुझा चेहरा मला पाहायचा आहे; सुरेश धसांचा हल्लाबोल
ट्रॅक्टर चोरी, चंदन चोरी, कुणालाही मारा, आका तुमच्यासोबत; आका शंभर टक्के 302 चा आरोपी, जल्लाद फाशी देईल तेव्हा तुझा चेहरा मला पाहायचा आहे; सुरेश धसांचा हल्लाबोल
Suresh Dhas on Walmik Karad : फ्लॅट, शाॅप ते त्या बिल्डरकडे टेरेसची मागणी! परळी लांब राहिली, पण सुरेश धसांनी आरोपांची मालिका करत वाल्मिक कराडची पुण्यातील कुंडलीच मांडली
फ्लॅट, शाॅप ते त्या बिल्डरकडे टेरेसची मागणी! परळी लांब राहिली, पण सुरेश धसांनी आरोपांची मालिका करत वाल्मिक कराडची पुण्यातील कुंडलीच मांडली
Suresh Dhas: परळीत करुणा शर्मांच्या कारमध्ये पिस्तुल ठेवणारा बुरखाधारी कोण?; सुरेश धसांनी नावासह सांगितलं
Suresh Dhas: परळीत करुणा शर्मांच्या कारमध्ये पिस्तुल ठेवणारा बुरखाधारी कोण?; सुरेश धसांनी नावासह सांगितलं
Embed widget