Zero Hour Mumbai Mahapalika :महापालिकेचे महामुद्दे :मुंबईत रखडलेल्या पुलांची समस्या अन् वाहतूक कोंडी
ब्रेकनंतर तुमचं स्वागत. सुरू आहे झीरो अवर. मंडळी आपल्या राज्यात अनेक मोठमोठी शहरं आहेत. मात्र त्या शहरांच्या लोकसंख्येप्रमाणं समस्याही प्रचंड आहेत. महापालिकेचे महामुद्दे या झीरो अवरच्या विशेष सत्रात या समस्यांबद्दल आम्ही राज्यभरातील महापालिकांना जाब विचारतोय.. त्याचा परिणामही दिसू लागला आहे. दोनच दिवसांपूर्वी आम्ही अमरावती कशी नालेसफाई होत नाही, यावर सविस्तर रिपोर्ट दाखवला होता. ४८ तासांच्या आत त्याचा इम्पॅक्ट झाला, आणि त्रिमूर्ती नगरच्या नाल्याची जेसीबीच्या सहाय्यानं सफाई करण्यात आली... त्यामुळे मंडळी.. जसं आम्ही तुम्हाल शब्द दिला होता.. तोच पुन्हा सांगतो.. हा झीरो अवर आहे.. तुमच्या हक्काचं व्यासपीठ... आणि महापालिकचे महामुद्दे.. म्हणजे तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर.. आणि आता सुरु करुयात आजचे महामुद्दे.. ((आता वळूयात आजच्या महामुद्द्यांकडे.. आज आपण मुंबईतील पुलांची अधुरी एक कहाणी पाहणार आहोत, तसंच मुंबईलाच लागून असलेल्या परिसरांना फेरीवाल्यांचा विळखा कसा पडलाय, तेही पाहणार आहोत. ))