एक्स्प्लोर

शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात

जे घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींना फडतूस म्हणणारे, एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील अशी टोकाची भाषा बोलणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर, देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर टोकाची राजकीय टीपण्णी करणाऱ्या ठाकरे-फडणवीसांची भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. या भेटीची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा होती, कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांचं अभिनंदन केलं नाही, याउलट गद्दार आणि घटनाबाह्य सरकार म्हणत टीकाच केल्याचं दिसून आलं. मात्र, ठाकरेंकडून फडणवीसांचं अभिनंदन केल्याने अनेकांनी प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आमदार आदित्य ठाकरेंनी तीनवेळा फडणवीसांची भेट घेतली असून आजही त्यांनी वरळी मतदारसंघातील विषयांसह विविध मुदद्यांवर चर्चा केली. आता, या भेटीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) विचारले असता, त्यांनी ठाकरेंच्या वक्तव्याची आठवण करुन दिली. 

जे घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींना फडतूस म्हणणारे, एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील अशी टोकाची भाषा बोलणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी ठाकरे-फडणवीस भेटीवर प्रतिक्रिया दिली. तसेच, सरडा रंग बदलतो पण अशा प्रकारची नवीन जातं मी पहिल्यांदा बघितली. लोकांनी ज्यांना झिडकारलं, लोकांच्या, बाळासाहेबांच्या, हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा केली, त्यांना जनतेने जागा दाखवून दिली आणि मतदारांनी त्यांचा कचरा केला. तुम लढो हम कपडा सांभालते है, तसं तुम लढो हम बुके देके आते है.. असं मी एकदा म्हटलं होतं, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे. संस्कृती, संस्कार महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेने शिकवले आहेत. शिव्या, शापाशिवाय ते काय बोलत नव्हते. पहिलं सरकार स्थापन झाल्यापासून शिव्या, शाप आणि आरोप त्याशिवाय दुसरं त्यांनी काहीच केलेलं नाही. तर, आम्ही आरोपांना आरोपांनी उत्तर दिल नाही, आम्ही कामातून उत्तर दिलं असे म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं आहे.  

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनवेळा भेट घेतली होती. नागपूर हिवाळी अधिवेशनात वडिल उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे फडणवीसांना भेटले होते. त्यानंतर, आता तिसऱ्यांदा त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन विविध विषयावर संवाद साधला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या गृहनिर्माण खात्यासंदर्भातील प्रश्नावरही त्यांनी मुख्यमंत्र्‍यांकडेच गाऱ्हाणं मांडल. त्यामुळे, एकनाथ शिंदेंना न भेटता पोलिसांच्या घरांसंदर्भातही आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना विनंती केली. त्यामुळे, ठाकरे-फडणवीस भेटीवर शिंदे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

हेही वाचा

पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका
उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका
Nitesh Rane & Devendra Fadnavis: नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल, नितेश राणेंना बोलावून समज दिली
नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल, नितेश राणेंना बोलावून समज दिली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 18 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सAurangzeb kabar Controversy : औरंगजेबच्या कबरीचं राजकारण नेमकं काय? A टू Z कहाणी Special ReportAstha Dahikar On Nagpur Rada: रिक्षा अडवली, धमकी दिली, तोडफोड, शिववीगाळ लेक अडकली, आई रडलीShweta Dahirkar On Rada:पै पै जोडून खरेदी केलेली कार जळून खाक,श्वेता दहिकरांनी सांगितला भयानक प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका
उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका
Nitesh Rane & Devendra Fadnavis: नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल, नितेश राणेंना बोलावून समज दिली
नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल, नितेश राणेंना बोलावून समज दिली
Nagpur violence: हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
जवान चंदू चव्हाणची आता पाकिस्तानकडेच मागणी; मला न्याय द्या, संरक्षणमंत्र्यांवर संताप, खासदारांचंही पत्र दाखवलं
जवान चंदू चव्हाणची आता पाकिस्तानकडेच मागणी; मला न्याय द्या, संरक्षणमंत्र्यांवर संताप, खासदारांचंही पत्र दाखवलं
Manoj Jarange Patil : नागपूर दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत; यांना कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? मनोज जरांगे यांचा घणाघात
नागपूर दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत; यांना कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? मनोज जरांगे यांचा घणाघात
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
Embed widget