एक्स्प्लोर

पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक

राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोलताना पुन्हा एकदा शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकुशलतेचं व संघटनाचं कौतुक केलंय.

मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर आता सर्वांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात याच महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या अनुषंगाने अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे, राजकीय पक्षांचे नेतेही कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने (NCP) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवसीयआढावा बैठकीदरम्यान विधानसभेत आपण गाफील राहिल्याची कबुली पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. विरोधकांना मिळालेल्या यशामागे संघाच्या प्रचाराचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. लोकसभेतलं घवघवीत यशामुळे आपण गाफील राहिलो. विधानसभा हातचा मळ असल्याचा समज केला. दुसरीकडे पराभवाची गांभीर्याने नोंद करत विरोधकांनी, संघाच्या (RSS) कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती. घरोघरी गेले, हिंदुत्वाचा प्रचार केला आणि दोन्ही बाजू मतदारांना सांगितल्या. त्याचा परिणाम निकालाच्या रुपात त्यांना मिळाल्याचे शरद पवार यांनी भाषणातून म्हटले. 

राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोलताना पुन्हा एकदा शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकुशलतेचं व संघटनाचं कौतुक केलंय. शरद पवारांकडून संघ परिवाराकडून सूक्ष्म पद्दतीने सुरू असलेल्या कामाचा पुन्हा एकदा भाषणातून उल्लेख करण्यात आला. संघ परिवाराकडून कार्यकत्यांच्या आयुष्यातील महत्वाची 20 वर्षे घेतली तरी त्याला वाऱ्यावर न सोडता योग्य ठिकाणी आयुष्यभरासाठी समायोजन केलं जात असल्याचं सांगण्यात आलं, यावेळी त्यांनी पुणे शहराचं उदाहरण दिलं. पुण्यासारख्या शहराची विद्येचे माहेरघर म्हणून ओळख आहे. मात्र, याच शहरातील प्रत्येक महत्वाच्या शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक काम करत आहेत. फर्ग्युसन महाविद्यालय, सप महाविद्यालय, मॉर्डन कॉलेज, एमइएस कॉलेजवर संघाचे कार्यकर्ते आहेत. अशा संस्थांवर अनेक वर्ष बाहेरच्या राज्यात संघासाठी काम करून पुन्हा माघारी आलेल्या लोकांना बसवलं जात आणि त्यांची आयुष्याची योग्य सोय लावली जात असल्याचे शरद पवारांनी आढावा बैठकीदरम्यानच्या भाषणात कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. 

एकीकडे कार्यकर्त्यांची आयुष्यभाराची सोय तर दुसरीकडे शिक्षण संस्थानातून नवीन कार्यकर्त्यांच्या संचय निर्माण करण्याचा प्रयत्न होतं असल्याचेही पवार यांनी म्हटले. यंदाच्या निवडणुकीत संघ परिवाराने घरा घरात जाऊन हिंदुत्वाचा प्रचार केला तर दुसरीकडे सरकारने सरकारी तिजोरीतील पैसे वाटून मत गोळा केली, असे म्हणत लाडकी बहीण योजनेचा परिणाम व विविध योजना राबविल्याने जनमत वळवण्यात सत्ताधारी यशस्वी ठरल्याचंही शरद पवारांनी सूचवलं आहे. 

मराठवाड्यात जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार - पवार

शरद पवारांनी आजच्या भाषणात मराठवाड्यातील स्थिती बाबत चिंता व्यक्त केली. सध्या जालना बीड परभणी येथे एका समाजाची लोकं दुसऱ्या समाजाच्या लोकांसोबत बोलत नाहीत, एका समाजाचे लोक दुसऱ्या समाजाच्या लोकांच्या दुकानात सुद्धा जात नाही, ही परिस्थितीती भयानक आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ही परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार घेईल, अशी घोषणा शरद पवारांनी केली. शरद पवार स्वत: जालना जिल्ह्यापासून गावा गावात जाऊन दुभंगलेली मने एक करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सध्या असलेली परिस्थिती बदलायची असेल तर काही दुरस्ती होणे गरजेचे आहे, यासाठी स्वत: प्रयत्न करणार असून त्यांच्यात शिव, शाहू, फुले आंबेडकर विचारधारा रुजवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. येथील परिस्थिती बदलण्यासाठी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणाचे उदाहरण कार्यकर्त्यांना देण्यात आले. नामांतर हा शब्दप्रयोग केला, त्यामुळे काही समाज नाराज झाला. मात्र, मुख्यमंत्री असताना नाम विस्तार हा शब्द प्रयोग केला. अनेक शाळांमधे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची प्रेरणा केली, त्यामुळे नंतर परिस्थीत बदलली असे शरद पवारांनी सांगितले. 

हेही वाचा

Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न

ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
ZP School : जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
Embed widget