Zero Hour Full : 'इंडिया'आघाडी दिल्लीत फुटणार? ते मुंबईतील रखडलेल्या पुलांची समस्या
नमस्कार मी विजय साळवी.. आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झीरो अवरमध्ये आपलं स्वागत...
मंडळी, आजचा दिवस महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात... चर्चेत राहिला तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी...
आता तुम्ही म्हणाल की असं काय झालं की ठाकरेंच्या शिवसेनेभोवतीच राजकारण फिरतं राहिलं... तर त्याची तीन कारणं आहेत.. दोन आहेत मुंबईतली.. आणि तिसरं दिल्लीत..
आधी मुंबईतली दोन कारणं सांगतो.. त्यांचं झालं असं की, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पुन्हा भेट घेतली.. गेल्या महिन्याभरातली ही तिसरी भेट असल्यानं अनेकांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील.. आता फडणवीस-ठाकरेंच्या भेटीत काय झालं हे आदित्य ठाकरेंनीच स्पष्ट केलं.. कारण काही असलं तरी चर्चा मात्र त्यांच्याच भेटीची झाली..
आता दुसरं कारण... ते होतं वांद्र्यातील एका आंदोलनात... म्हणजे वांद्रे पूर्व येथील भारतनगरात... एस आर ए... म्हणजेच स्लम रिडेव्हलपमेंटकडून काही घरांना पाडकामाच्या नोटिसा आल्या.. त्यावर स्थानिक नागरिक कोर्टात गेले.. आणि त्यानंतर पाडकामाला कोर्टानं स्थगिती दिल्याचा दावा स्थानिकांनी केलाय.. आता ही स्थगिती असतानाही एस आर ए कडून घरं पाडण्याची कारवाई सुरु झाली.. म्हणून रहिवाशी आक्रमक झाले.. आज जेव्हा तिथं पोलिसांच्या फौजफाट्यासह आधिकारी पोहोचले.. तेव्हा वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाईही तिथं आले.. त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेचं आंदोलन सुरु झालं.. आणि काही काळ स्थिती तणावाची बनली होती.. असं असलं तरी ज्या ज्या घरांना नोटिसा होत्या.. त्यापैकी ज्या घरमालकांनी घरं रिकामी करुन दिली.. ती घरं पाडण्यात आली... बाकीच्या तोडकामावर पुन्हा स्थगिती मिळाली.. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन चर्चेत राहिलं..
तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कारण... ज्याचा थेट परिणाम देशाच्या राजकारणावर होऊ शकतो.. ते आहे दिल्ली.. मंडळी.. नुकत्याच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात...
सत्ताधारी आम आदमी पक्षाला काँग्रेसची साथ मिळेल आणि दोघांच्या युतीसमोर भाजपचं आव्हान असेल असं वाटलं होतं.. पण, तसं होण्याऐवजी... इथली निवडणूक त्रिशंकू होतेय.. आम आदमी पक्ष विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस... असा हा सामना रंगतोय.. खरी बातमी तर आताय.. आणि त्याच दिल्लीच्या तख्तासाठी सुरु असलेल्या लढतीत... इंडिया आघाडीतून मित्रपक्षांची साथ कोणाला मिळते.. याची देशभर चर्चा सुरुय.. त्यातच ममता बॅनर्जींच्या तृणमूल, अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षांना आम आदमी पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केलाय.. याच मित्रपक्षांच्या यादीत आज आणखी एक नाव जोडलं जाऊ शकतं.. ते नाव आहे... उद्धव ठाकरेंची शिवसेना..
आम्ही असं काय म्हणतोय.. तर त्यांचं उत्तर आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यात आहे...