Health Tips : सावधान! सकाळी रिकाम्या पोटी 'या' गोष्टी करू नका, शरीरासाठी ठरेल घातक
Health Tips : तुम्हीही रिकाम्या पोटी 'ही' कामं करत असाल, तर तुमच्या शरीराचे नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊया.
Health Tips : बहुतेक लोक सकाळी उठल्यावर भुकेलेले असतात त्यामुळे काहीतरी खायला शोधतात. जास्त वेळ उपाशी राहिल्यास त्यांना अॅसिडीटी, पोटदुखी, उलट्या, रक्तातील साखर कमी होण्याचा त्रास होऊ लागतो. मात्र रिकाम्या पोटी काही गोष्टी खाल्ल्याने शरीरासाठी घातक ठरु शकते. तुमचे आरोग्य बिघडू शकते. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सकाळी रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी करू नयेत. चला जाणून घेऊया.
रिकाम्या पोटी कॉफी पिऊ नका
जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी कॉफी प्यायली तर तुमच्या पोटात आम्लपित्त तयार होईल आणि याचे कारण म्हणजे कॉफीमध्ये असलेला एक घटक ज्यामुळे शरीरातील हायड्रोक्लोरिक ऍसिड वाढवते. यामुळेच सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिणे त्रासदायक ठरू शकते.
रिकाम्या पोटी चिंगम चघळू नका
रिकाम्या पोटी चिंगम चघळणे चांगले नाही. चघळणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती चघळायला लागते तेव्हा आपल्या पोटात पाचक ऍसिड तयार होण्यास सुरुवात होते. रिकाम्या पोटी या पाचक ऍसिडमुळे ऍसिडिटीपासून अल्सरपर्यंत अनेक समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे रिकाम्या पोटी च्युइंगम चघळल्यासारखे वागणे चांगले नाही.
रिकाम्या पोटी दारू पिऊ नका
जर तुमच्या पोटात अन्न नसेल आणि तुम्ही रिकाम्या पोटी दारू पीत असाल तर दारू थेट तुमच्या रक्तप्रवाहात जाते. अल्कोहोल थेट रक्तप्रवाहात पोहोचले की ते लगेचच रक्तवाहिन्या आणि संपूर्ण शरीरात पसरते. त्यामुळे आपल्याला लगेचच झटका बसल्याप्रमाणे होऊन शरीरामध्ये उष्णता जाणवते. त्यामुळे आपल्या नाडीचा वेग कमी होतो. तो आपल्या पोटातून मूत्रपिंड, फुफ्फुस, यकृत आणि नंतर मेंदूपर्यंत पोहोचतो. हे होण्यास फार कमी वेळ पुरेसा ठरतो. हे तुमच्या शरीरासाठी घाक ठरु शकते. तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीने रिकाम्या पोटी घेतलेल्या अल्कोहोलपैकी 20 टक्के अल्कोहोल 1 मिनिटात मेंदूपर्यंत पोहोचते आणि त्यामुळे नुकसान होते. पोट भरलेले राहिल्यास अल्कोहोल रक्तप्रवाहात वेगाने पोहोचत नाही त्यामुळे रिकाम्या पोटी दारु पिणे घातक ठरु शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : रोज ओट्स खाल्ल्याने आरोग्याला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे, वजनही होईल कमी
- Health Tips : स्मरणशक्ती वाढवायचीय? 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )