Covid19 Update : बदलत्या ऋतूत वाढतोय कोरोनाचा धोका! आजार टाळण्यासाठी 'ही' खबरदारी घ्या
Covid19 Protocol : कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे. तुमचा निष्काळजीपणा महागात पडू शकतो. त्यामुळे योग्य ती खबरदारी बाळगा.
Covid Cases In India : बदलत्या ऋतूत पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. यामागचं मोठं कारण म्हणजे निष्काळजीपणा आणि बदलतं हवामान आहे. बदलत्या मोसमात कोरोना अधिक फोफावल्याचं याआधीही पाहायला मिळालं आहे. त्यामुळे खबरदारी बाळगणं हाचं उत्तम उपाय आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणं गरजेच आहे.
1. बूस्टर डोस घ्या.
तुम्हाला कोरोना टाळायचा असेल तर कोरोना लसीचा बूस्टर डोस नक्की घ्या. त्यामुळे कोरोनाचा धोका बर्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. पण लस घेतल्यानंतरही तुम्हाला पूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे.
2. मास्क घालणे.
तुम्ही कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी गेलात तर मास्क नक्की वापरा. सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना अशा ठिकाणी नेऊ नका. चांगल्या दर्जाचे मास्क वापरा आणि सॅनिटायझरचा वापर करा.
3. आहाराची काळजी घ्या.
बदलत्या ऋतूत खाण्यापिण्याचा सर्वाधिक परिणाम आरोग्यावर होतो. कडक उन्हाळ्यानंतर आता पावसामुळे वातावरणात अचानक गारवा वाढला आहे. अशा परिस्थितीत थंड आणि फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तू खाणं टाळा. गरम आणि ताजे अन्नपदार्थ खा. पावसात पचनशक्ती कमकुवत होते, त्यामुळे हलके अन्न खावं.
4. प्रतिकारशक्ती वाढवा.
पावसाळ्यात सर्दी, ताप आणि व्हायरल फ्लूही पसरतो. अशा परिस्थितीत, तुमची प्रतिकारशक्ती मजबूत असणं महत्वाचं आहे. या मोसमात व्हिटॅमिन सी युक्त फळे आणि भाज्यांचं सेवन करा. ड्रायफ्रुट्स खा. यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्त्व मिळतील आणि प्रतिकारशक्ती वाढेल.
5. हिवाळ्यातील थंडी टाळा.
पावसाळ्यात थोडीसा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो. पावसात भिजणेंटाळा. सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होत असल्यास वाफ घ्या. गरम पाणी प्या. रात्री झोपताना हळदीचं दूध प्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Copper Water : तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळ ठेवणं फायदेशीर? तुम्ही करु नका 'ही' चूक
- Health Tips : मुलांचं वजन कमी होतंय? मुलं सारखी आजारी पडतायत? 'ही' आहेत यामागची कारणं
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )