एक्स्प्लोर

Health Tips : मुलांचं वजन कमी होतंय? मुलं सारखी आजारी पडतायत? 'ही' आहेत यामागची कारणं

Kids Health : पाच वर्षापर्यंतच्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमकुवत असते. त्यामुळे वारंवार आजारी पडणाऱ्या मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि आजारांपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी 'या' गोष्टींची काळजी घ्या.

Kids Immunity : लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमकुवत असते. विशेषत: पाच वर्षापर्यंतच्या लहान मुले अधिक आजारी पडतात. त्यामुळे वारंवार आजारी पडणाऱ्या लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि आजारांपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनाकाळात घरातच राहिल्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमकुवत झाली आहे. जन्मानंतर प्रथमच बाहेर जाणारी दोन - तीन वर्षांची मुलं इतर मुलांपेक्षा जास्त आजारी पडत आहेत. यामागचं कारण म्हणजे लहान मुलं पहिल्यांदाच बाहेरील वातावरणात खेळणं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कारण मुलांना बाहेरील वातावरणाची सवय नाही. याआधी लहान मुलं घरी राहिल्यानं आजारी पडत होती, मात्र अशी मुले घरातून बाहेर पडल्याने आजारी पडत आहेत. जर तुमचे मूलं देखील वारंवार आजारी पडत असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. यामागील कारण काय असू शकते आणि मुलाला आजारी पडण्यापासून कसे वाचवायचे ते जाणून घ्या.

1. प्रतिकारशक्ती वाढवा.

कोणत्याही आजारांपासून दूर राहण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती चांगली असणं फार महत्त्वाचं आहे. मुलांची प्रतिकारशक्ती वयानुसार हळूहळू वाढते. त्यामुळे मुलांना योग्य पौष्टीक आहार देण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मुलांचं वजन वाढेल. लहान मुलांना हंगामी फळे, भाज्या, अंडी, दूध, चीज आणि इतर सकस आहार द्या.

2. जंतांचे औषध द्या.

अनेक वेळा मुलांच्या पोटात कृमी म्हणजेच जंत होतात, त्यामुळे मूल चिडचिड होऊन लवकर आजारी पडते. अशा परिस्थितीत मुलाला काही खावे-पिवेसे वाटत नाही. जर तुमच्या मुलांचे वजन कमी होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने दर सहा महिन्यांनी मुलाला जंताचं औषध द्या.

3. फ्लूचा शॉट घ्या.

जर लहान मुलांना वारंवार सर्दी होत असेल, तर बदलत्या मोसमात व्हायरलची लस घ्यावी. यामुळे सर्दी-पडसे आणि व्हायरल फ्लूपासून लहान मुलांचं मोठ्या प्रमाणात संरक्षण होईल.

4. मल्टीविटामिन द्या.

लहान मुलांना दररोज मल्टीविटामिन द्या. यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती अधिक मजबूत होईल आणि मुलाच्या शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता दूर होईल. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलांना काही प्रोटीन सप्लिमेंट देणेही त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर राहील.

5. आहारावर लक्ष द्या.

आजकाल मुलं जंक फूड खूप खातात. मॅगी, पिझ्झा, बर्गर, चॉकलेट, चिप्स, केक हे पदार्थ सगळ्याच मुलांना आवडतात. मुलांना या गोष्टींपासून शक्य तितकं दूर ठेवा आणि त्यांना पौष्टिक आहार द्या. मुलांना घरीच बनवलेल्या ताज्या हिरव्या भाज्या, रोटी, भात, डाळी, अंडी, चीज, दूध, दही खायला द्या. मुलांच्या आहारात दिवसातून दोन - तीन वेळा दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh on Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात, अहवाल कधी येणार?Amarnath Yatra Jammu Kashmir : अमरनाथ यात्रेला सुरूवात; 28 हजारहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शनBhushi Dam Lonavala : नसतं साहस जीवावर बेतलं, वाहून गेलेल्या पैकी चौघांचे मृतदेह सापडलेABP Majha Headlines :  12:00PM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Embed widget