Bokavirus : 'बोका व्हायरस' म्हणजे नेमकं काय? वाचा यामागची लक्षणं आणि उपचार
Bokavirus : बोका व्हायरस हा प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळून येतो. हिवाळ्यामध्ये या व्हायरसचा संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो.

Bokavirus : बोकाव्हायरसचा पहिला रुग्ण 2005 मध्ये आढळला होता. बोकाव्हायरसमध्ये टाईप एक, टाइप दोन आणि टाइप चार यांसारखे अनेक प्रकार आहेत. टाइप 1 विषाणू प्रामुख्याने श्वसनमार्गाच्या संसर्गाशी संबंधित आहे. वैद्यकीय उपचार केलेल्या मुलाला टाईप एक विषाणूची बाधा झाली होती. टाईप दोन आणि चार यामध्ये अतिसार, ओटीपोटात दुखणे या लक्षणांसह गॅस्ट्रोएन्टरोलॉजी म्हणजे पोटाच्या विकाराशी संबंधित संसर्ग असल्याचे दिसून आले आहे. हा विषाणू प्रामुख्याने तीन वर्षांखालील मुलांना संक्रमित करतो. खोकला, सर्दी आणि श्वसनमार्गाचे संक्रमण ही लक्षणे दिसून येतात.
बोका व्हायरस हा प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळून येतो. हिवाळ्यामध्ये या व्हायरसचा संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. बोका व्हायरसमध्ये टाईप 1, टाईप 2, आणि टाईप 4 सारखे अनेक प्रकार आहेत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























