Thalapathy Vijay Share Post After Wife Files Divorce: एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे थलपति विजयची पहिली पोस्ट, म्हणाला, 'जीत पक्की है...'
Thalapathy Vijay Share Post After Wife Files Divorce: एकीकडे थलपती विजयच्या बायकोनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय आणि दुसरीकडे विजयनं घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केलीय.

Thalapathy Vijay Share Post After Wife Files Divorce: सुपरस्टार विजय थलपती (Superstar Vijay Thalpati) आणि त्यांची पत्नी संगीता सोर्नालिंगम (Sangeetha Sornalingam) यांच्या घटस्फोटाच्या (Divorce) चर्चांना उधाण आलं आहे. सुपरस्टार अभिनेत्याच्या पत्नीनं त्याच्यावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप लावत घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. दोघांनी अलिकडेच चेंगलपट्टू जिल्हा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. काही दिवसांनी, अभिनेता-राजकारणी असलेल्या विजयनं सोशल मीडियावर त्याची पहिली पोस्ट शेअर केली आहे. सोमवारी, विजयनं ट्विटरवर तामिळनाडू आणि पुडुचेरीमधील बारावीच्या सार्वजनिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तमिळमध्ये लिहिलेल्या पोस्टमध्ये विजय थलपती म्हणालाय की, "तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये बारावीच्या सार्वजनिक परीक्षा देणाऱ्या माझ्या प्रिय लहान बंधू आणि बहिणींना शुभेच्छा..."
पुढे बोलताना थलपती विजय म्हणाला की, "उद्या आनंदी समाज निर्माण करण्यास तयार असलेल्या तुम्ही सर्वांनी चिंता न करता, भीती न बाळगता आणि धैर्यानं या परीक्षा द्या... तुमच्या उच्च शिक्षणासाठी आगाऊ शुभेच्छा! फक्त चांगल्या गोष्टी घडतील! विजय निश्चित आहे! अधिकृत वेळापत्रकानुसार, टीएन एचएसई + 2 परीक्षा 2 मार्च ते 26 मार्च दरम्यान होत आहेत..."
தமிழ்நாடு மற்றும் புதுச்சேரியில் 12ஆம் வகுப்புப் பொதுத் தேர்வு எழுதும் என் அன்புத் தம்பிகளுக்கும் தங்கைகளுக்கும் வாழ்த்துகள்.
— TVK Vijay (@TVKVijayHQ) March 2, 2026
நாளைய வளமான சமுதாயத்தை உருவாக்க உள்ள நீங்கள் அனைவரும் இந்தத் தேர்வினைப் பதற்றமின்றி, அச்சமின்றி, துணிவுடன் எதிர்கொள்ளுங்கள். உயர்கல்வியில் சிறந்து…
एकीकडे विजयच्या वैयक्तिक आयुष्यात गोंधळ उडाला आहे. तर, दुसरीकडे विजय थलपतीनं पोस्ट करुन बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगमनं अलिकडेच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, विजयच्या पत्नीनं घटस्फोटाच्या याचिकेत सुपरस्टावर गंभीर आरोप लावले आहेत. 2021 मध्ये विजयचे एका महिला सह-कलाकारासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचं आढळलं, त्यामुळे संगीताला भावनिक आणि मानसिक त्रास झाला, जो विश्वासघात आणि वैवाहिक विश्वासाचा भंग आहे...", असं आरोप केलाय.
लग्न पूर्णपणे मोडल्याचं सांगत संगीतानं विजयचं उत्पन्न आणि सोशल स्टेटसच्या हिशोबानं कायमस्वरुपी पोटगीची मागणी केली आहे. तिनं याचिकेवर निकाल येईपर्यंत किंवा त्याऐवजी समान घर मिळेपर्यंत, तिनं नीलंकराई इथल्या तिच्या सासरच्या घरी राहण्याच्या अधिकाराचीही मागणी केली आहे. तसेच, समान घर मिळावं, अशी मागणीही केली आहे.
विजय, ज्याला त्याचे चाहते थलापथी विजय म्हणून ओळखतात, तो तमिळनाडू वेत्री कझगम (TVK) चे संस्थापक अध्यक्ष आहेत. येत्या काही महिन्यांत तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका अपेक्षित असल्यानं, घटस्फोटाच्या याचिकेनं लक्षणीय लक्ष वेधलं आहे. अभिनेत्यानं जुलै 1998 मध्ये युनायटेड किंग्डममध्ये संकागीताशी लग्न केलं.
68 सिनेमांमध्ये काम केल्यानंतर, विजय त्याच्या 69 वा सिनेमा 'जन नायकन' नंतर सिनेसृष्टीपासून दूर जाईल आणि केवळ त्याच्या राजकीय कारकिर्दीवर लक्ष केंद्रीत करेल अशी अपेक्षा होती. दरम्यान, हा सिनेमा अद्याप प्रदर्शित झालेला नाही आणि सध्या तो सेन्सॉरमध्ये अडकला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























