एक्स्प्लोर

Vasai Accident News: मित्राची गाडी घेऊन नवखा चालक फिरायला निघाला, ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबलं अन् कारचे नियंत्रण सुटून 9 जणांना उडवलं; वसईतील घटना

Vasai Accident News: ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबले गेले आणि कार थेट रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर आदळली.

वसई  :  होळीच्या पूर्वसंध्येला वसईतील सातीवली परिसरात एका कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याने चालणाऱ्या ९ जणांना धडक दिल्याची घटना काल (सोमवारी ता २) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.(Vasai Accident News)

ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबले गेले

मिळालेल्या माहितीनुसार, शेरवलेट कंपनीची ‘बीट’ कार चालवणारा मोबिन मोनिर अहमद (वय ४९, रा. सातीवली, मौर्या नगर – भाडेकरू) हा नवीन चालक असून मित्राची कार घेऊन परिसरात फिरत होता. मौर्या नगर येथे गर्दीच्या ठिकाणी गाडी चालवत असताना त्याच्याकडून ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबले गेले आणि कार थेट रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर आदळली.(Vasai Accident News)या अपघातात जखमी झालेल्या नऊ जणांपैकी काहींना प्लॅटिनम हॉस्पिटल (Platinum Hospital) येथे, तर तिघांना डी.एम. पेटिट हॉस्पिटल (D.M. Petit Hospital) मध्ये दाखल करण्यात आले. एका जखमीवर विवान हॉस्पिटल (Vivan Hospital) येथे उपचार करण्यात आले. सर्व जखमींना किरकोळ दुखापत झाली असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. काहींना तीन ते पाच टाके घालावे लागल्याची माहिती समोर आली आहे.(Vasai Accident News)

दरम्यान, घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वालीव पोलीसांनी चालक मोबिन मोनिर अहमद याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शीने याबाबत माहिती देताना सांगितलं की ही घटना घडली त्याच ठिकाणी माझं मेडिकल आहे. साधारण साडेआठ नऊ वाजण्याच्या सुमारास मी मेडिकल मध्ये होतो त्याच वेळेला खूप स्पीडमध्ये एक गाडी आली आणि पुढे येऊन थांबली मला वाटलं काहीतरी झाला असेल पण लोकांना उडवत ती गाडी तिथपर्यंत आली होती, सात ते आठ लोकांना त्या गाडीने उडवलं होतं काही जण जखमी झाली आहेत.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना मदत करत त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवले. काही काळासाठी परिसरात मोठी गर्दी जमली होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे होळीच्या सणाच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली.

वालीव पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चालक नव्याने वाहन चालवू लागल्याची बाब प्राथमिक चौकशीत समोर आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्याला 7 वर्षाच्या शिक्षेसह 5 लाखांचा दंड, धर्मांतरविरोधी कायद्याच्या प्रस्तावाला  मंत्रींमंडळाची मंजुरी
जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्याला 7 वर्षाच्या शिक्षेसह 5 लाखांचा दंड, धर्मांतरविरोधी कायद्याच्या प्रस्तावाला  मंत्रींमंडळाची मंजुरी
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget