एक्स्प्लोर

Iron Beam : ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात

US Israel Attack On Iran : आयरन बीम या प्रणालीची खासियत म्हणजे यात पारंपरिक मिसाइल किंवा रॉकेट्सऐवजी उच्च-ऊर्जा लेझर किरणांचा वापर करून लक्ष्य हवेतच नष्ट केलं जातं.

Israel Iran War : इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायलने आपल्या सर्वात आधुनिक हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक असलेल्या ‘आयरन बीम’चा (Iron Beam) प्रत्यक्ष युद्धात पहिल्यांदाच वापर केला आहे. या प्रणालीची खासियत म्हणजे यात पारंपरिक मिसाइल किंवा रॉकेट्सऐवजी उच्च-ऊर्जा लेझर किरणांचा वापर करून लक्ष्य हवेतच नष्ट केलं जातं. लेबनॉनमधील हिजबुल्लाहकडून डागण्यात आलेल्या रॉकेट्सना हवेतच निष्प्रभ करण्यात या प्रणालीने यश मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे इस्त्रायलच्या बहुपर्यायी संरक्षण व्यवस्थेत (Multi Layered Defense) आणखी एक मजबूत स्तर जोडला गेला आहे.

आयरन बीम म्हणजे काय? (What is Iron Beam)

आयरन बीम ही उच्च-ऊर्जा लेझर वेपन सिस्टीम (High Energy Laser Weapon System  HELWS) आधारित हवाई संरक्षण प्रणाली आहे. ती राफेल अॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्स या कंपनीने विकसित केली आहे. सुमारे 100 किलोवॅट क्षमतेचा हा लेझर काही किलोमीटर अंतरावरून रॉकेट्स, मोर्टार शेल्स, आर्टिलरी आणि ड्रोनसारख्या अल्प पल्ल्याच्या धोक्यांना लक्ष्य करू शकतो. ही प्रणाली इस्त्रायलच्या आयरन डोम, डेव्हिड्स स्लिंग आणि अॅरो सिस्टीमसोबत समन्वयाने काम करते. ‘ओर एतान’ (हिब्रू भाषेत ‘मजबूत प्रकाश’) या नावानेही ती ओळखली जाते.

आयरन बीम कसे काम करते? (How Iron Beam Works)

सर्वप्रथम रडारद्वारे येणारा धोका ओळखला जातो. त्यानंतर लेझर जनरेटर लक्ष्यावर प्रकाशकिरण सोडतो. प्रकाशाचा वेग सुमारे 3 लाख किमी प्रति सेकंद असल्याने लक्ष्य काही सेकंदांत गाठले जाते. 

अनेक सूक्ष्म लेझर किरणे एकत्रित फोकस करून तीव्र उष्णता निर्माण केली जाते. त्यामुळे लक्ष्याचा बाह्य भाग वितळतो किंवा स्फोट होतो. जर एक किरण लक्ष्याला अचूक भिडला तर इतर किरणे त्याच बिंदूकडे केंद्रित होतात, ज्यामुळे परिणाम अधिक प्रभावी ठरतो.

खर्च, क्षमता आणि मर्यादा (Cost & Capabilities)

या प्रणालीतील प्रत्येक ‘शॉट’चा खर्च फक्त 2 ते 10 डॉलर इतका (वीज खर्च) असल्याचे सांगितले जाते, तर पारंपरिक मिसाइल इंटरसेप्शनला हजारो डॉलर खर्च येतो. त्यामुळे ड्रोन युद्धात ही प्रणाली अत्यंत किफायतशीर मानली जाते.

तथापि, सध्या तिची कार्यक्षमता सुमारे 10 किमी अंतरापर्यंत मर्यादित आहे. मुसळधार पाऊस किंवा दाट ढगाळ वातावरणात कार्यक्षमता काहीशी कमी होऊ शकते. मोठ्या लक्ष्यांवर परिणामकारकता वाढवण्यासाठी सुधारणा सुरू असल्याचे सांगितले जाते.

‘रोरिंग लायन’ मोहिमेत पहिला वापर (First Combat Use in Operation)

2014 मध्ये या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती. दशकभराच्या संशोधनानंतर 2025 मध्ये ती कार्यान्वित घोषित करण्यात आली. 2026 मधील ‘रोरिंग लायन’ या लष्करी कारवाईत प्रथमच मोठ्या प्रमाणावर तिचा वापर करण्यात आला. 2 मार्च रोजी इस्त्रायल डिफेन्स फोर्सेसने (IDF) हिजबुल्लाहच्या रॉकेट्सना हवेतच नष्ट केल्याची पुष्टी केल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर लेझर किरणांनी लक्ष्य भेदल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

आयरन बीममुळे पारंपरिक क्षेपणास्त्रांवर अवलंबित्व कमी होऊन भविष्यातील युद्धतंत्रात मोठा बदल होऊ शकतो, असं संरक्षण तज्ज्ञांचं मत आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: 10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा, नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले
10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा, नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget