Health Tips : शरीरातील अँटीऑक्सिडंटची कमतरता 'या' शाकाहारी पदार्थांनी भरून काढा; आरोग्यासाठी वरदान
Health Tips : पालकामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.
Health Tips : शरीराला (Health) योग्य पोषण मिळण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स खूप गरजेचे असतात. हे आपल्या पेशी आणि ऊतींचे संरक्षण करतात. तसेच, अनेक गंभीर रोगांपासून आपलं संरक्षण करतात. जेव्हा आपले शरीर तणावाखाली असते तेव्हा त्यामध्ये फ्री रॅडिकल्स नावाचे काही हानिकारक फ्री रॅडिकल्स तयार होतात. हे कण पेशींचे नुकसान करू शकतात. अँटिऑक्सिडंट हे मुक्त रॅडिकल्स काढून टाकतात आणि पेशींचे संरक्षण करतात.
याशिवाय अँटिऑक्सिडंट्स फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने यांसारख्या महत्त्वाच्या पदार्थांना खराब होण्यापासून वाचवतात. अँटिऑक्सिडेंट्स युक्त पदार्थांचं सेवन केल्याने कर्करोग, मधुमेह आणि हृदयाचे आजार टाळता येतात. त्यामुळे अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थ खाणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी काही अँटिऑक्सिडंट्स युक्त पदार्थांची नावं आम्ही सांगणार आहोत ज्याचं सेवन तुम्ही करू शकता.
स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी हे अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील पेशींचे संरक्षण करतात आणि रोगांशी लढण्यास मदत करतात. स्ट्रॉबेरीमध्ये दोन मुख्य अँटिऑक्सिडंट आढळतात. फ्लेव्होनॉईड्स आणि अँथोसायनिन्स. फ्लेव्होनॉईड्स पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि शरीरात मुक्त रॅडिकल्सला प्रतिबंध करतात. अँथोसायनिन फ्री रॅडिकल अॅक्टिव्हिटी देखील कमी करते आणि कॅन्सरशी लढण्यास मदत करतात. त्यामुळे स्ट्रॉबेरी खाल्ल्याने शरीरातील अँटिऑक्सिडंट्स वाढतात आणि अनेक आजारांपासून आपला बचाव करता येतो.
पालक
पालकामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. पालकामध्ये कॅरोटीनोइड्स, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई नावाचे अँटीऑक्सिडंट असतात. कॅरोटीनॉइड नावाचे अँटीऑक्सिडंट्स आपल्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मुक्त रॅडिकल्सची क्रिया कमी करून आपली प्रतिकारशक्ती वाढवतात.म्हणूनच पालक खाल्ल्याने शरीरातील अँटीऑक्सिडंट्स वाढतात आणि अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते.
ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये ग्लुकोराफेनिन नावाचा विशेष प्रकारचा अँटीऑक्सिडंट असतो. कॅन्सरसारख्या आजारांशी लढण्यास मदत होते. ग्लुकोराफेनिन नावाचे अँटीऑक्सिडंट मुक्त रॅडिकल्सला प्रतिबंधित करते ज्यामुळे कर्करोगासारखे आजार होतात. हे आपली प्रतिकारशक्ती देखील मजबूत करते ज्यामुळे आपले शरीर रोगांशी लढू शकते. त्यामुळे ब्रोकोली खाल्ल्याने शरीरातील अँटिऑक्सिडेंट्स वाढतात आणि अनेक आजारांपासून, विशेषत: कर्करोगापासून आपले संरक्षण होते. यासोबतच तुम्ही तुमच्या आहारात टोमॅटो, द्राक्षे, अक्रोड इत्यादींचा समावेश करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :