एक्स्प्लोर
कमी वयातच केस पांढरे?; जाणून घ्या कारणं आणि उपाय!
सध्या अनेकांना कमी वयातच पांढऱ्या केसांचा सामना करावा लागतो. फक्त प्रौढ लोकांनाच नाहीतर अनेक तरूणांनाही या समस्यांचा सामना करावा लागतो. कामाचा व्याप आणि त्यामुळे वाढणारा तणाव हे यामागील सर्वात महत्त्वाचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई : सध्या अनेकांना कमी वयातच पांढऱ्या केसांचा सामना करावा लागतो. फक्त प्रौढ लोकांनाच नाहीतर अनेक तरूणांनाही या समस्यांचा सामना करावा लागतो. कामाचा व्याप आणि त्यामुळे वाढणारा तणाव हे यामागील सर्वात महत्त्वाचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. तणावामुळे अनेकांना तर कमी वयातच या समस्यांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया अशा काही कारणांबाबत ज्यांमुळे कमी वयातच पांढऱ्या केसांच्या समस्यांचा समान करावा लागतो. तसेच यांपासून बचाव करण्याच्या काही उपायांबाबत...
वाढणारा तणाव सर्वात मोठं कारण
केस पांढरे होण्याचं सर्वात मोठं कारण वाढणारा तणाव आहे. कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे अनेकजण डिप्रेशनमध्ये जातात. सतत विचार केल्यामुळे मेंदूच्या पेशींवर परिणाम होतो. याच कारणामुळे कमी वयातच लोकांना केस पांढरे होण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यापासून बचाव करण्यासाठी शक्यतो स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण तणावामुळे किंवा डिप्रेशनमुळे पांढऱ्या केसांसोबतच इतरही आजारांचा सामना करावा लागतो.
हिवाळ्यात बदामाचं सेवन करणं ठरत फायदेशीर; जाणून घ्या फायदे
व्हिटॅमिन्सची कमतरता
आपल्या शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी आपल्याला अनेक व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. व्हिटॅमिन्स शरीरासोबतच केसांचं आरोग्य राखण्यासाठीही मदत करतात. काही मेडिकल जर्नल्समध्ये यावर रिसर्च करण्यात आलेला आहे आणि त्याच आधारावर असं सांगण्यात येतं की, सुंदर केसांसाठी व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ईची आवश्यकता असते.
केसांना तेल न लावणं
सध्याच्या फॅशन युगात खासकरून तरूण-तरूणींना केसांना तेल लावायला अजिबात आवडत नाही. परंतु, केसांचं आरोग्य राखण्यासाठी आणि त्यांचं सौंदर्य टिकवण्यासाठी केसांना तेल लावणं आवश्यक असतं. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात तेल लावत नसाल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावून झोपू शकता. आठवड्यातून एकदा तरी केसांना तेल लावून मालिश करा. यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि त्यांचं सौंदर्य टिकवण्यासही मदत होते.
झोपेची कमतरता
कमी झोप घेतल्यामुळे केसांच्या वाढिवर त्याचा परिणाम होतो आणि केस गळण्यास सुरुवात होते. तुम्हाला जर चांगले आणि सुंदर केल पाहिजे असतील तर पुरेशी झोपं घेणं गरजेचं असतं. कमी झोप घेणं हे तणावाचंही कारण ठरू शकतं आणि आधी सांगितल्यानुसार, तणावामुळे कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या वाढते.
खोबऱ्याचे तेल फक्त केस आणि त्वचेसाठी नाहीतर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर; जाणून घ्या कसं?
अनुवंशिक कारण
अनेकदा अनुवंशिक कारणांमुळेही केसांवर परिणाम होतो आणि कमी वयातच केस पांढरे होतात. जर तुमच्या परिवारातील कोणाचे केस वेळेआधीच पांढरे झाले असतील किंवा केस गळत असतील तर तुमचेही केस पांढरे होऊ शकतात. केस पांढरे होण्यासाठी जर अनुवंशिक कारणं असतील तर यासाठी तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागते. तसेच आहारातही पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा लागेल.
धुम्रपान किंवा मद्यसेवन
अनेकदा कमी वयात केस पांढरे होण्यासाठी धुम्रपान आणि मद्यसेवन या गोष्टी कारणीभूत ठरतात.
केमिकलयुक्त उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर वापर
अनेकदा आपण जाहिरातींना बळी पडून केमिकल युक्त उत्पादनांचा वापर करतो. या परिणामांमुळे केसांच्या वाढिवर परिणाम होतो आणि केसांचा रंगही पांढरा होतो. त्यामुळे केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करणं शक्यतो टाळा.
टिप : सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement