एक्स्प्लोर

खोबऱ्याचे तेल फक्त केस आणि त्वचेसाठी नाहीतर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर; जाणून घ्या कसं?

खोबऱ्याच्या तेलाचे फायदे आपल्या सर्वांना माहितच आहेत. आयुर्वेदातही खोबऱ्याच्या तेलाचे आरोग्यवर्धक गुणधर्म सांगण्यात आले आहे. हे तेल त्वचा आणि केसांसाठी गुणकारी ठरतंच, पण तुम्हाला माहित आहे का? या तेलाचा वापर तुम्ही जेवणातही करु शकता. एवढंच नाहीतर खोबऱ्याचे तेल अनेक आजारांमध्येही फायदेशीर ठरते.

मुंबई : खोबऱ्याच्या तेलाचे फायदे आपल्या सर्वांना माहितच आहेत. आयुर्वेदातही खोबऱ्याच्या तेलाचे आरोग्यवर्धक गुणधर्म सांगण्यात आले आहे. हे तेल त्वचा आणि केसांसाठी गुणकारी ठरतंच, पण तुम्हाला माहित आहे का? या तेलाचा वापर तुम्ही जेवणातही करू शकता. एवढंच नाहीतर खोबऱ्याचे तेल अनेक आजारांमध्येही फायदेशीर ठरते. सध्या वातावरण बदलत असून बदलणाऱ्या वातावरणामुळे ताप, सर्दी-खोकला आणि घशाच्या विकारांचा सामना करावा लागतो. यांपैकी काही समस्या तुम्ही घरगुती उपायानेही दूर करू शकता. जाणून घेऊया अशा समस्यांवर खोबऱ्याच्या तेलाचा वापर कसा करावा याबाबत काही टिप्स... घशात होणारी खवखव दूर करण्यासाठी खोबऱ्याचे तेल - - घशात होणारी खवखव दूर करण्यासाठी खोबऱ्याचे तेल हा उत्तम उपाय आहे. खोबऱ्यामध्ये असणारे अॅन्टीइंफ्लेमेट्री गुणधर्म घशातील खवखवीमुळे उद्भवणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी मदत करतात. तसेच खोबऱ्याच्या तेलामध्ये जे अॅन्टीसेप्टिक गुणधर्म असतात. ते बॅक्टेरिया, फंगस आणि इतर व्हायरसशी लढण्यासाठी मदत करतात. घशातील खवखव दूर करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा असा करा वापर : घशातील खवखव दूर करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. एका वाटीत थोडेसे खोबऱ्याचे तेल घेऊन ते गरम करा आणि त्याने गळ्याला मालिश करा. त्यानंतर एखाद्या कॉटनच्या कापडाच्या मदतीने गळ्याभोवती अलगद गुंडाळून ठेवा. यामुळे गळ्याची समस्या दूर होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त खोबऱ्याचं तेल, मध आणि लिंबाचा उपयोग करून घरातच एक सिरप तयार करू शकता. हे सिरप आणखी गुणकारी करण्यासाठी त्यामध्ये आल्याचा रस आणि काही तुळशीच्या पानांचाही वापर करू शकता. कफ सिरप तयार करण्यासाठी लागणारं साहित्य : 4 चमचे ताज्या लिंबाचा रस एक कप मध 3 चमचे खोबऱ्याचं तेल असं तयार करा घरच्या घरी कफ सिरप : गॅसवर मध्यम आचेवर एक पॅन ठेवा, सर्व साहित्य एका भांड्यात व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यानंतर मिश्रण गॅसवरील पॅनमध्ये ठेवून गरम करा. काही वेळाने गॅस बंद करा आणि सिरप एका हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करा. तयार सिरप तुम्ही एक ग्लास गरम पाण्यात किंवा ग्रीन टीसोबत एकत्र करू शकता. घशात होणारी खवखव दूर करण्यासोबतच सर्दी-खोकल्यावरही हे सिरप गुणकारी ठरतं. एवढंच नाहीतर हे सिरप इन्फेक्शन होण्यास कारण ठरणारे बॅक्टेरिया दूर करण्यासाठीही मदत करतात. टिप : सदर उपाय घरगुती असून तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याचा वापर करणे फायदेशीर ठरते, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Embed widget