Health Tips : शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी दररोज 'हे' एनर्जी ड्रिंक्स प्या, मिळतील अनेक फायदे
Health Tips : ऊर्जा मिळविण्यासाठी लोक बाजारात उपलब्ध असलेल्या प्रोटीन पावडरचा अवलंब करतात. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही घरी बनवलेल्या काही खास पेयांनीही तुमची एनर्जी वाढवू शकता.
Energy Drink Benefits : आजच्या व्यस्त जीवनशैलीचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम झाला आहे. यामुळेच दिवसभर घर आणि ऑफिसमध्ये काम केल्यानंतर संध्याकाळी थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. अशा वेळी शरीराला थोडी उर्जा हवी असते. ऊर्जा मिळविण्यासाठी लोक प्रथिने पावडर (protin powder), सप्लिमेंट्स इत्यादींचा वापर करतात. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही घरी बनवलेल्या काही खास पेयांनीही तुमची एनर्जी वाढवू शकता. एनर्जी ड्रिंक तुमची कमजोरी, थकवा दूर करते. त्याच वेळी, ते तुम्हाला मजबूत बनवते. एनर्जी ड्रिंक्स तुम्हाला सतत सक्रिय ठेवू शकतात. त्यामुळे दिवसभराच्या कामानंतर तुम्ही त्यांचा आहारात समावेश करू शकता. तुमच्या शरीरासाठी कोणते ड्रिंक्स आवश्यक आहेत ते जाणून घ्या.
अशक्तपणा दूर करण्यासाठी एनर्जी ड्रिंक्स :
नारळ पाणी आणि लिंबू - नारळ पाणी हे सर्वोत्तम नैसर्गिक ऊर्जा पेय मानले जाते. अनेक वेळा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा किंवा थकवा जाणवू लागतो. अशा परिस्थितीत नारळ पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. नारळपाणी हे एक एनर्जी ड्रिंक असले तरी त्यात लिंबूही टाकता येते. लिंबूमुळे शरीराला त्वरित ऊर्जा देते.
तयार करण्याची पद्धत - हे पेय करण्यासाठी तुम्ही एक कप नारळाचे पाणी घ्या. त्यात एक चमचा मध आणि पाच थेंब लिंबाचा रस घाला. त्यानंतर त्यात मीठ घालावे. तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा वाटत असल्यास आतापासून हे पेय घ्या.
पालक आणि अननस एनर्जी ड्रिंक - पालक, अननस आणि सफरचंदापासून बनवलेले एनर्जी ड्रिंक शरीराला ताकद देण्यास मदत करते. दिवसभर काम करून थकवा जाणवत असेल तर तुम्ही हे पेय पिऊ शकता.
तयार करण्याची पद्धत - यासाठी तुम्ही एक कप पालक घ्या. त्यात अननसाचे छोटे तुकडे आणि एक कप सफरचंद टाकून स्मूदी बनवा. यानंतर मीठ आणि लिंबू घालून हे पेय प्या.
या व्यतिरिक्त तुम्ही दिवसभर कमीत कमी तीन लीटर पाणी जरी प्यायलात तरी तुमच्या शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. तसेच आरोग्याच्या समस्याही उद्भवत नाहीत.
महत्वाच्या बातम्या :
- Pineapple Benefits: अननस खा अन् वजन कमी करा! जाणून घ्या याचे फायदे...
- Lassa fever : ओमायक्रॉननंतर धुमाकूळ घालतोय 'लासा फिवर'; काय आहेत लक्षणं?
- Weight Loss : वजन कमी करण्यासाठी अनोशेपोटी घ्या 'हे' ड्रिंक्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )