Chandrapur Thackeray Politics | ठाकरेंचा आदेश धुडकावणारे नगरसेवक 'मातोश्री'वर, ठाकरेंशी अर्धा तास चर्चा? Special Report
Chandrapur Thackeray Politics | ठाकरेंचा आदेश धुडकावणारे नगरसेवक 'मातोश्री'वर, ठाकरेंशी अर्धा तास चर्चा? Special Report
चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेचं जेवढं नाट्य रंगलं, तेवढं कोणत्याच महापालिकेत रंगलं नाही.. उद्धव ठाकरेंचा आदेश धुडकावत नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आणि चंद्रपुरात काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली.. मात्र आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्याचं धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवलं नाही... दरम्यान आज चंद्रपूरचे नगरसेवक मातोश्री बंगल्यावर आले होते.. उद्धव ठाकरेंशी त्यांनी अर्धा तास चर्चा केली.. या अर्धा तासात उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांचे कान उपटले की पाठीवर कौतुकाची थाप दिली? पाहुयात ही इनसाईड स्टोरी
जवळपास ९०० किलोमीटरचा प्रवास करत, या मंडळींनी उद्धव ठाकरेंचं निवासस्थान, म्हणजे मातोश्री बंगला गाठलाय..
चंद्रपूरला जरी हे चेहरे चांगले परिचीत असले, तरी संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख करून देणं गरजेचं आहे..
हे आहेत चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवत, भाजपचा महापौर विराजमान करण्यासाठी पाठिंबा देणारे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अर्धा डझन नगरसेवक....
आणि त्यांच्या सोबतीला दोन अपक्ष नगरसेवक
पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्याचं धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवलं नाही.
पण जाब विचारण्याचे सोपस्कार पार पाडण्यासाठी त्यांना मुंबईला बोलावण्यात आलं.
तेही चंद्रपुरात भाजपची सत्ता स्थापन झाल्याच्या पंधरा दिवसानंतर...
आता भाजपला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांचे कान उपटण्यात आले?...
की यशस्वीरित्या चंद्रपूर महापालिकेत सत्तेत सहभागी झाले म्हणून पाठ थोपटण्यात आली?...
याचं उत्तर उद्धव ठाकरे, नगरसेवक आणि मातोश्री बंगल्याच्या भिंतींनाच माहिती...
All Shows


































