एक्स्प्लोर

T20 World Cup: सूर्या आर्मीचं 'मिशन सुपर एट'!

T20 World Cup: टी-ट्वेन्टी विश्वचषकाचा पडदा आता खऱ्या अर्थाने सुपरहिट सिनेमे प्रदर्शित करेल. स्पर्धा रंजक वळणावर आलीय. आव्हान असेल ते सुपर एट फेरीचं. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अत्यंत अननुभवी असे काही संघ खेळत असल्याने काही सामने फारच एकतर्फी झाले. त्याच वेळी झिम्बाब्वेसारख्या संघाने ऑसींना धूळ चारली तसंच नेपाळसारख्या नवख्या संघाने इंग्लंडचा घामटा काढलेला. असं असलं तरी आता खरी रेस सुरु झालीय ती सेमी फायनलची. अव्वल आठ संघ पुढच्या फेरीत दाखल झालेत. अर्थात यात कांगारू नसतील. त्यांना एक नव्हे तर दोन धक्के बसले. आधी झिम्बाब्वेकडून मग श्रीलंकेकडून. त्यामुळे कांगारू पुढची फेरी घरी जाऊन पाहतील.

त्याच वेळी आपली सूर्या आर्मी सुपर एटच्या मॅचेससाठी सज्ज होतेय. पहिलीच लढाई फिटनेससाठी आणि कडव्या प्रतिकारासाठी ओळखल्या जाणाऱ्या आफ्रिकन टीमशी आहे. आपल्या ग्रुपमध्ये अमेरिका, नामिबिया, नेदरलँड्ससारखे क्रिकेटमधील पाळण्यातले संघ होते. अर्थात आधी अमेरिका आणि नंतर नेदरलँड्सनेही आपल्याला चांगली फाईट दिली. तुलनेने नामिबिया आणि पाकिस्तान टीमला आपण सहज चिरडून टाकलं.

आता इथून पुढची प्रत्येक मॅच आपला सर्वच आघाड्यांवर कस पाहणारी असेल.

ईशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग अशी स्फोटक फलंदाजांची फळी आपल्याकडे आहे. त्यात ईशान किशन भन्नाटच फॉर्मात आहे. मधल्या काळात संघातलं स्थान त्याला गमवावं लागलं होतं. तो बॅकलॉग ईशान किशन सव्याज वसूल करतोय. अभिषेक शर्माला गेल्या दोन सामन्यात भोपळा मिळालाय. तेव्हा पुढच्या मॅचमध्ये याची भरपाई करायला त्याचेही हात शिवशिवत असतील. अर्थात याआधीच्या संघांच्या तुलनेत आफ्रिकेची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण वरच्या दर्जाचं आहे. साहजिकच आपल्याला या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न व्यवस्थित सोडवावा लागेल.

आपल्या मॅचेस अहमदाबाद, चेन्नई आणि कोलकातामध्ये आहेत. तिन्ही ठिकाणी खेळपट्ट्या फिरकीला काहीशा पोषक असू शकतात. आपली बॅटिंग पॉवरहाऊस आहेच. फिरकीमध्येही वरुण चक्रवर्ती आपला हुकमी एक्का आहे, त्याच्यासोबत अक्षर पटेलच्या रुपात चांगला ऑलराऊंडर आपल्याकडे आहे. सोबत बुमरा, पंड्या, अर्शदीप, सिराज शिवम दुबे आणि गरज भासल्यास अभिषेक अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजीची फळी दिमतीला आहे. कुलदीप यादवची फिरकीही आव्हान निर्माण करू शकते.

आपला टी-ट्वेन्टी मॅचेसमधला आणि विश्वचषकातलाही रेकॉर्ड अफलातून आहे. अर्थात क्रिकेटच्या खेळात मागची आकडेवारी हा इतिहास असते आणि आपल्याला वर्तमानात इतिहास घडवण्यासाठी खेळावं लागतं. त्यात टी-ट्वेन्टी हा असा खेळ आहे की, एखाद-दोन ओव्हरमध्ये होत्याचं नव्हतं होत असतं. तुम्हाला 2016 टी-ट्वेन्टी वर्ल्डकप फायनलमधली बेन स्टोक्सची लास्ट ओव्हर आणि समोर ब्रॅथवॅटची धडकी भरवणारी फलंदाजी आठवत असेल. लागोपाठ चार टोलेजंग षटकार ठोकत त्याने इंग्लंडच्या आव्हानाचा पालापाचोळा केला आणि विजेतेपदाचा प्याला विंडिज संघाच्या ओठाला लावला.

अर्थात हाही पुन्हा इतिहासच झाला. असं असलं तरीही टी-ट्वेन्टी सामना म्हणजे 'नजर हटी दुर्घटना घटी' किंवा प्रत्येक धाव म्हणजे जिंकण्यासाठीचा डाव अशाच पद्धतीने या मॅचकडे पाहायला लागतं.

रोहित शर्माने गाठलेली विजेतेपदाच्या एव्हरेस्टची उंची सूर्यकुमार यादवच्या टीमला कायम ठेवायचीय. अर्थात सुरुवात चांगली झालीय. रोहितसेनेने गाठलेल्या त्याच कळसावर आपल्याला राज्य करायचंय. याकरता सूर्या अँड कंपनीला शुभेच्छा देऊया.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget