एक्स्प्लोर

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा धडाका सुरुच, भारताच्या सौर उत्पादनांच्या आयातीवर तब्बल 126 टक्के टॅरिफ, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांचा आक्रमक बाणा

Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापलेले आहेत. सुप्रीम कोर्टात टॅरिफच्या मुद्यावर अपयश आल्यानंतर ट्रम्प यांचा निर्णयांचा धडाका सुरु आहे. 

Donald Trump नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टात टॅरिफच्या मुद्यावर अपयश आल्यानंतर ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. अमेरिकन सुप्रीम कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय बेकायदेशीर ठरवला होता. यानंतर ट्रम्प यांनी पहिल्यांदा सर्व देशांवर 10 टक्के टॅरिफ लागू करत असल्याची घोषणा केली. यानंतर पुढे जात ट्रम्प यांनी ते 10 वरुन 15 टक्क्यांपर्यंत वाढवलं. आता अमेरिकेनं भारत, इंडोनेशिया आणि लाओस या सारख्या देशांमधील सौर उत्पादनांच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात  टॅरिफ लावलं आहे. अमेरिकेनं भारतीय सौर उत्पादनांवर 126 टक्के टॅरिफ लादलं आहे. यामुळं या निर्णयाचा परिणाम सौर ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांवर झाला आहे.   

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार अमेरिकेच्या वाणिज्य विभागानं भारतातून आयात केल्या जाणाऱ्या सौर उत्पादनांच्या आयातीवर 126 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. इंडोनेशियासाठी हे शुल्क 86 टक्के 143 टक्क्यांदरम्यान असेल. लाओस साठी हे शुल्क 81 टक्के निर्धारीत करण्यात आलं आहे. आयात शुल्काचे दर विदेशातील सब्सिडी लक्षात घेत तयार करण्यात आली आहेत. अमेरिकेच्या मते या देशातील निर्यातदार अमेरिकेमधील देशांतर्गत सौर ऊर्जा उत्पादकांच्या तुलनेत कमी किमतीवर उत्पादन निर्यात करण्यास परवानगी मिळते. ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून अधिक  टॅरिफ लावण्याचं कारण म्हणजे देशांतर्गत सौर ऊर्जा उत्पादकांना अधिक लाभ पोहोचवणं आहे. 

भारतावर काय परिणाम होणार?

अमेरिकेकडून  भारतीय सौर उत्पादनांवर 126 टक्के टॅरिफ लादण्यात आल्यानं भारतीय निर्यातीवर परिणाम होईल. या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळू शकते. वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी पाहिली असता  2024 मध्ये भारतानं अमेरिकेला 792.6 दशलक्ष डॉलरची निर्यात केली होती. गेल्या काही दशकांमध्ये भारताची सौर ऊर्जा निर्यात वाढली होती. ट्रम्प यांनी ज्या तीन देशांना टारगेट केलेलं आहे त्या देशांकडून अमेरिकेनं 4.5 अब्ज डॉलर्सची सौर उत्पादनांची आयात केली होती. 

रिपोर्टनुसार 2025 च्या पहिल्या सहा महिन्यात अमेरिकन  सौर ऊर्जा उत्पादनांच्या एकूण आयातीपैकी 57 टक्के आयात भारत, इंडोनेशिया आणि लाओसमधून केली होती.  यामुळं  डोनाल्ड ट्रम्प यांनी या तीन देशांवर टॅरिफ लादण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायक मानला जात आहे. 

20 फेब्रुवारीला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांनी कायद्याच्या गैरवापर करत टॅरिफ लादल्याचा निर्णय दिला होता. ट्रम्प यांची टॅरिफ रद्द केली होती. मात्र, ट्रम्प यांनी त्यानंतर कलम 122 चा वापर करत जागतिक टॅरिफ 15 टक्के केलं आहे. हे टॅरिफ 150 दिवस कायम असेल, त्यानंतर टॅरिफ पुढं ठेवण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची मान्यता लागेल.   

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gratuity Rules :  'या' चुकीमुळे कंपनी रोखू शकते ग्रॅच्युइटीचे पैसे
Gratuity Rules :  'या' चुकीमुळे कंपनी रोखू शकते ग्रॅच्युइटीचे पैसे
Gold Price: इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना सोन्याच्या किमतीत घसरण का? आता दर वाढणार की कमी होणार? जाणून घ्या सविस्तर
इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना सोन्याच्या किमतीत घसरण का? आता दर वाढणार की कमी होणार? जाणून घ्या सविस्तर
Best Selling Car : SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार
SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार
राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास करणं महागालं! 1 एप्रिलपासून वार्षिक टोल पासच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या सविस्तर माहिती
राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास करणं महागालं! 1 एप्रिलपासून वार्षिक टोल पासच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या सविस्तर माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
Iran : अमेरिकेनं रशियन तेलाची आयात नको यासाठी महिने घालवले, आता रशियाचं तेल घ्या म्हणून भारतासह जगाला विनवण्या, इराणच्या विदेश मंत्र्यांचं ट्रम्प यांच्या वर्मावर बोट
अमेरिका भारतासह जगाला रशियन तेल खरेदीसाठी विनवण्या करतेय, इराणच्या विदेश मंत्र्यांचा हल्लाबोल
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
Embed widget