एक्स्प्लोर

Krishnaraaj Mahadik: जगातील एक नंबरचे नेते मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भाजप जगातील एक नंबरचा पक्ष; कृष्णराज महाडिकांची भाजप युवा मोर्चाची जबाबदारी मिळताच काय काय म्हणाले?

Krishnaraaj Mahadik: हे पद केवळ कृष्णराज महाडिक यांचे नसून महाराष्ट्रातील युवकांचे आहे. राज्यपातळीवर काम करण्याची संधी ही मोठी जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Krishnaraaj Mahadik: जगातील एक नंबरचे नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष जगातील एक नंबरचा पक्ष ठरला आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजप युवा मोर्चाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक (Krishnaraj Mahadik) यांनी आपल्या राजकीय प्रवासाची दिशा स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या संधीबद्दल त्यांनी आभार मानले. “हे पद केवळ कृष्णराज महाडिक यांचे नसून महाराष्ट्रातील युवकांचे आहे. राज्यपातळीवर काम करण्याची संधी ही मोठी जबाबदारी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

“मोठी जबाबदारी, मोठा विश्वास”

कृष्णराज महाडिक म्हणाले की, “मी ज्या पदासाठी इच्छुक होतो, त्यापेक्षा मोठी जबाबदारी फडणवीस यांनी माझ्यावर सोपवली आहे. पक्षाने योग्य वाटेल तो निर्णय घेतला आहे आणि पक्षाचा निर्णय माझ्यासाठी अंतिम आहे.” या नियुक्तीनंतर अवघ्या काही तासांत जवळपास एक हजारांहून अधिक फोन कॉल्स आल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे नमूद केले. “मी उत्साहाने कामाला लागलो आहे,” असेही त्यांनी सांगितले.

पदापेक्षा माझ्या चारित्र्याला जास्त महत्त्व असेल

आपल्या यशामागे परिवाराचा मोठा वाटा असल्याचे सांगताना त्यांनी वडील धनंजय महाडिक, आई आणि दोन्ही बंधूंचे सहकार्य लाभल्याचे नमूद केले. “पदापेक्षा माझ्या चारित्र्याला जास्त महत्त्व असेल. अभ्यासासाठी वेळ दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून प्रेरणा घेतो. त्यांचा विषयांवरील अभ्यास आणि कार्यपद्धती मला मार्गदर्शक आहे,” असे ते म्हणाले.

युवकांचा आवाज बनण्याचा निर्धार

छोट्या गावांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत युवकांचा आवाज बनण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “युवकांची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील युवकांच्या मागण्या पक्षापर्यंत पोहोचविण्याचे काम करीन,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षासारखाच मीही ऑलराऊंडर आहे

खेळाडू आणि समाजसेवक म्हणून यापूर्वी काम केल्याचा उल्लेख करत त्यांनी आता राजकीय प्रवास औपचारिकरित्या सुरू झाल्याचे सांगितले. “पक्षासारखाच मीही ऑलराऊंडर आहे,” असे म्हणत त्यांनी युवकांना राजकारण आणि समाजकारणात सक्रिय होण्याचे आवाहन केले. “युवकांनी माझ्यासोबत आणि पक्षासोबत जोडले जावे,” असे आवाहन त्यांनी केले.

स्किल डेव्हलपमेंट आणि आयटी पार्कवर भर

कोल्हापूरमध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि आयटी पार्कसंदर्भात काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. “येत्या काळात त्याचे परिणाम दिसतील. आता कोल्हापूरपुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर दौरे करणार आहे,” असे ते म्हणाले.

अन्यायाचा प्रश्नच नाही

आपल्या नियुक्तीबाबत कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, “पक्षाने जो निर्णय घेतला तो योग्य आहे. यात भरपाईचा किंवा तडजोडीचा प्रश्न नाही.”

सरकारमार्फत प्रश्न सोडविण्याचा विश्वास

युवकांचे प्रश्न सरकारकडून सोडवले जातील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की, “माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी राज्यभर पोहोचलो आहे. आता संघटनात्मक पातळीवर काम करत युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.” मोदी यांच्या नेतृत्वावर आणि भाजपच्या संघटनशक्तीवर ठाम विश्वास व्यक्त करत कृष्णराज महाडिक यांनी युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या या नव्या जबाबदारीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
Sanjeev Sonawane Latur Crime: संजीव सोनवणे यांनी आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेल्या पत्रातील त्या वाक्याने गूढ वाढवलं, म्हणाले, ‘I am a good fool’; मेसेजमुळे चर्चेला उधाण
संजीव सोनवणेंनी आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेल्या पत्रातील त्या वाक्याने गूढ वाढवलं, म्हणाले, ‘I am a good fool’; मेसेजमुळे चर्चेला उधाण
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त स्वरुपात फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त स्वरुपात फक्त एका क्लिकवर...
Ashish Shelar : मनोज जरांगे यांचे आंदोलन अतर्क, आताताईपणा अन् अर्वाच्च भाषेचं, छत्रपतींना मानणारा...; मंत्री आशिष शेलार भडकले, मराठा समाजालाही आवाहन
मनोज जरांगे यांचे आंदोलन अतर्क, आताताईपणा अन् अर्वाच्च भाषेचं, छत्रपतींना मानणारा...; मंत्री आशिष शेलार भडकले, मराठा समाजालाही आवाहन

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
Rinku Singh: सव्वा वर्षापूर्वी साखरपुडा अन् आता रिंकू आणि खासदार सरोज लग्नाच्या बेडीत अडकणार, हाॅटेलसकट मुहूर्तही ठरला
सव्वा वर्षापूर्वी साखरपुडा अन् आता रिंकू आणि खासदार सरोज लग्नाच्या बेडीत अडकणार, हाॅटेलसकट मुहूर्तही ठरला
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
Cabinet Meeting : मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना "इन्शाअल्लाह, जझाकअल्लाह" म्हणताच थेट बदली, टीम इंडियाचा माजी कॅप्टन तडकाफडकी निर्णयावर भडकला
Sanjeev Sonawane Latur Crime: संजीव सोनवणे यांनी आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेल्या पत्रातील त्या वाक्याने गूढ वाढवलं, म्हणाले, ‘I am a good fool’; मेसेजमुळे चर्चेला उधाण
संजीव सोनवणेंनी आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेल्या पत्रातील त्या वाक्याने गूढ वाढवलं, म्हणाले, ‘I am a good fool’; मेसेजमुळे चर्चेला उधाण
Nashik Crime News: आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
Embed widget