Health Care Tips : अंडी शरीरासाठी फायदेशीर, पण अतिसेवन अपायकारक; उद्भवतील 'या' समस्या
जास्त अंडी खाल्याने तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
Health Care Tips : अंड्यांमध्ये अनेक पोषक तत्त्वे असतात. अंड्यामध्ये प्रोटीन, विटामिन बी12 आणि विटामिन डी असते. लोक वर्कआऊट करायच्या आधी किंवा नंतर उकडलेली अंडी खातात. काही लोकांना अंडा करी, ऑम्लेट, भूर्जी आणि अंडा मसाला हे अंड्याचे पदार्थ खायला आवडतात. पण जास्त अंडी खाल्याने तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊयात जास्त अंडी खाल्याने काय नुकसान होऊ शकते.
दररोज 3 अंडी खाल्ल्याने आरोग्यासंबंधीच्या बऱ्याच तक्रारी कमी होतात. अंड्यासोबत पिवळ्या रंगीची ढोबळी मिर्ची खाल्याने तुमचे वजन कमी होते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास डोकेदुखी, अशक्तपणा यासारखे आजार सतावत असतात. अंडी खाल्ल्याने हे आजार दूर होतात. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शिअम आणि प्रथिने असतात. नियमित अंडी खाल्याने हाडं बळकट होतात. अंडी खाल्याने रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी राहाते. पण जर तुम्ही जास्त अंडी खाल्ली तर त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. त्यामुळे जर जास्त अंडी खाल्ली तर तुम्हाला जुलाब देखील होऊ शकतात. पोट फुगणे, पोटात जळजळ होणे इत्यादी समस्या तुम्हाला जास्त अंडी खाण्याने होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये एक, लंचमध्ये एक आणि डिनरमध्ये एक अशी दिवसातून 3 अंडे खाऊ शकता.
Weight Loss Tips : डाएटमध्ये अंड्यासोबत 'हे' पदार्थ खा; झटपट होईल वजन कमी
एका रिपोर्टनुसार, अंड्याचे तीन भाग असतात. अंड्याचं कवच (एग शेल), पिवळा बलक (एग योक) आणि पांढरा भाग (एग व्हाईट). पांढऱ्या भागात फक्त प्रथिनंच असतात, तर पिवळा बलक हा प्रथिनं, कोलेस्ट्रॉल आणि फॅट्सपासून बनला असतो.
Kitchen Hacks: Chocolate खायला आवडतात? घरीच तयार करा टेस्टी चॉकलेट, जाणून घ्या सोपी रेसिपी
टीप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )