एक्स्प्लोर

Dipawali 2022 : 'दीपावली' नावामागचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या दीपावलीची विविध नावं

Dipawali 2022 : दिवाळी (Diwali) या सणाला दीपावली (Dipawali) असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली.

Dipawali 2022 : भारतात प्रामुख्याने साजरा केला जाणारा दिवाळी (Diwali 2022) हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हटलं की अगदी लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. दिवाळी सणाची बदलती व्याख्या देखील आपण सर्वांनी कोरोना काळात अनुभवली आहे. दिवाळीबरोबर अशाच काही नवीन-जुन्या आठवणी आपल्या कायम स्मरणात आहेत. मात्र, दिवाळी नावामागचा अर्थ नेमका काय? दिवाळीला अनेक जण वेगवेगळ्या नावांनी संबोधतात ही नावे कोणती हे या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत. 

दिपावलीची विविध नावे (Names Of Dipawali) :

दिवाळी (Diwali) या सणाला दीपावली (Dipawali) असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. "दीप" म्हणजे "दिवा" आणि "आवली" म्हणजेच "ओळ". याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना. अर्थात दिवाळी. दिवाळी या सणाला काही जण दिपवाळी (Dipwali) असे देखील म्हणतात. मात्र, दिवाळीचा शुद्ध शब्द हा "दीपावली" आहे. मुळात, दिवाळी या शब्दाचा प्रत्येक प्रांतात, भाषेत वेगवेगळ्या शब्द प्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो. पण अर्थ एकच आहे.

अशी आहे आख्यायिका :

दीपावलीचे मूळचे नाव "यक्षरात्री" असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे अशी आख्यायिका आहे. नीलमत पुराणया ग्रंथात या सणास "दीपमाला" असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला "दीपप्रतिपदुत्सव" असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात "दिवाळी" हा शब्द वापरला आहे. भविष्योत्तर पुराणात दिवाळीला "दीपालिका" म्हटले आहे. तसेच, काल्विवेक या ग्रंथात तिचा उल्लेख "सुखरात्रि" असा येतो. व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात "सुख सुप्तिका" म्हणून दिवाळी ओळखली जाते.

असा हा दिपावली नावामागचा अर्थ आहे. मात्र, या नावाचे अर्थ जरी वेगळे असले तरी मात्र, प्रत्येकजण आपुलकीनुसार त्या नावाचा उच्चार करत असतो. या सगळ्यात मात्र, दिवाळीचा आनंद, उत्साह आणि जल्लोष प्रत्येक भारतीयांच्या मनात कायम असतो. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

National Epilepsy Day 2026: अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
Health: बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
Chatt Puja 2026: छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
Happy Children’s Day 2026: बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा सुंदर, हटके 'हे' शुभेच्छा संदेश, चेहऱ्यावर फुलवा हास्य ...
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा सुंदर, हटके 'हे' शुभेच्छा संदेश, चेहऱ्यावर फुलवा हास्य ...

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
Eknath Shinde: रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
Pune Crime Daund: आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
Mumbai Local Crime News: अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
भाजपा कार्यकर्त्याची माघार, जळगाव जिल्हा बँकेसाठी गिरीश महाजन बिनविरोध; गुलाबराव पाटीलही जिंकले
भाजपा कार्यकर्त्याची माघार, जळगाव जिल्हा बँकेसाठी गिरीश महाजन बिनविरोध; गुलाबराव पाटीलही जिंकले
Ajit Pawar Plane Crash :अजित पवार प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई पोलीस आणि डीजीसीएचा नकार,बारामतीमधील वकिलाचा दावा
अजित पवार प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई पोलीस आणि डीजीसीएचा नकार,बारामतीमधील वकिलाचा दावा
Chiplun Crime News: रात्री घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही; सांगलीतील तरूणाला चिपळूणमध्ये संपवलं, जांभा दगड डोक्यात घातला अन्...; पोलिसांनी दिली माहिती
रात्री घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही; सांगलीतील तरूणाला चिपळूणमध्ये संपवलं, जांभा दगड डोक्यात घातला अन्...; पोलिसांनी दिली माहिती
Embed widget