एक्स्प्लोर

बिहार सरकारकडून मायक्रो फायनान्स कंपन्यांना चाप, कर्जदारांना दिलासा;  एका निर्णयानं मायक्रो फायनान्स कंपन्यांचे स्टॉक पडले

Micro Finance : बिहार सरकारनं मायक्रो फायनान्स कंपन्यांसाठी नवे नियम लागू केले आहेत. यामुळं या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये घसरण झाली. 

नवी दिल्ली : बिहार सरकारनं मायक्रो फायनान्स कंपन्यांसाठी नवे नियम बनवले आहेत. बिहार सरकारच्या मायक्रो फायनान्स कंपन्यांसंदर्भातील कडक धोरणामुळं दिवसभरात मायक्रो फायनान्स कंपन्यांचे स्टॉक पडल्याचं दिसून आलं. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, फ्यूजन फायनान्स आणि एल अँड टी फायनान्स या सूक्ष्मवित्त पुरवठा करणाऱ्या म्हणजेच मायक्रो फायनान्स कंपन्यांचे  स्टॉक घसरले आहेत. 

बिहार सरकारचे नवे नियम 

बिहार सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार मायक्रो फायनान्स कंनप्यांना आरबीआयचा परवाना असला तरी बिहार सरकारकडे नोंदणी करावी लागेल. 

कंपन्यांना नव्या नियमानुसार मुद्दल जितकं असेल त्या पेक्षा अधिक रक्कम व्याज म्हणून वसूल करता येणार नाही. म्हणजेच जर 10000 रुपयांचं कर्ज एखाद्यानं घेतला असेल तर व्याजाची रक्कम त्यापेक्षा अधिक असू नये.

कंपन्यांना आता कर्ज देण्यापूर्वी राज्याच्या वित्त विभागाची परवानगी घ्यावी लागेल.यामुळं सरकार पाहू शकेल की कर्ज घेणारा व्यक्ती किंवा संस्था पहिल्यापासून कर्जबाजारी आहे की नाही. 

कर्ज वसुलीचे नियम देखील कठोर करण्यात आले आहेत. एखादी कंपनी कर्जवसुली करण्यासाठी धमकावत असेल तर ते कृत्य गुन्हेगारी स्वरुपाचं मानलं जाईल. या नियमांचा उद्देश कंपन्यांची मनमानी थांबवणे आणि गरीब कर्जदारांना वाचवणे हा आहे. जर एखादी कंपनी जबरदस्ती वसुली करत असल तर तातडीनं कारवाई केली जाईल. 

एखाद्या व्यक्तीला किती कर्ज द्यावं, याची मर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. एखादा व्यक्ती एका वेळेस केवळ दोन संस्थांकडून कर्ज घेऊ शकतो. याचा उद्देश लोकांना कर्जाच्या जाळ्यातून वाचवणं आहे. 

मायक्रो फायनान्स कंपन्यांचे स्टॉक्स घसरले 

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या शेअरमध्ये 6 टक्के घसरण झाली. हा स्टॉक  13.91 रुपयांवर बंद झाला.तर, एल अँड टी फायनान्स होल्डिंग्जच्या  शेअरमध्ये 19.65 रुपयांची घसरण झाली. एल अँड टीचा शेअर 280.25 रुपयांवर पोहोचला. तर, फ्यूजन फायनान्सच्या शेअरमध्ये 14.01 रुपयांची घसरण झाली. हा स्टॉक 190 रुपयांवर बंद झाला.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget