एक्स्प्लोर

देवाच्या कृपेने फसवणुकीपासून वाचले; अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने सांगितली आपबिती, फसवणुकीचा नवा फंडा

मुंबईकरांची गेल्या दोन महिन्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन फसवून झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडचा अधिकारी असल्याचं भासवून फसवण्याचे (Crime news) प्रकार सुरूच असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. अभिनेता चिन्मय मांडलेकरने याबाबत माहिती दिल्यानंतर आता अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना देखील फ्रॉड कॉल आला होता . मात्र, वेळीच सावध होऊन त्यांनी फ्रॉडने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केलं नाही, त्यात त्यांचा आयफोन महत्त्वाचा ठरला. आयफोन असल्याने संबंधित एपीके फाईल क्लिक होऊन ओपन झाली नसल्याचेही ऐश्वर्या नारकर (Aishwarya) यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे.  

मुंबईकरांची गेल्या दोन महिन्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन फसवून झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामध्ये, काहींना लाखोंचा गंडा बसला असून काहींच्या सतर्कतेमुळे ते आर्थिक भुर्दंड बसण्यापासून बचावले आहेत. मुंबईतील अनेक भागांमध्ये याबाब तक्रारीही दाखल आहेत. आपल्या गॅसचे पैसे थकीत असल्याचे सांगून संबंधित व्यक्तीस पैसे भरायला सांगितले जाते. तसेच, पैसे न भरल्यास गॅस लाईन कट होण्याची सुद्धा भीती दाखवली जाते. आरोपीकडून एक लिंक पाठवून ती क्लिक करण्यास सांगितली जाते. त्या लिंकवर जाताच कार्ड नंबर आणि पिन मागितला जातो, काही वेळाने खात्यातून पैसे वजा होतात, असा हा स्कॅमचा प्रकार आहे. मुंबईतील दहिसर, बोरिवली, जुहू, अणूशक्ती नगर, अंधेरी या भागांमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच, आता अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीही घडल्या प्रकाराची माहिती देत सर्वांना अलर्ट केलं आहे.  

ऐश्वर्या नारकरांची आपबिती

देवाच्या कृपेने एका स्कॅममधून वाचले, म्हणून हा व्हिडिओ बनवून मी सर्वांना अलर्ट करत आहे. 4-5 दिवसांपूर्वी मला व्हॉट्सअपवर मेसेज आला होता, महानगर गॅसच्या नावाने हा मेसेज होता की, तुमच्याकडे गॅसचे बिल पेंडिंग आहे. मात्र, मी आत्तापर्यंतची सगळी बिलं दिली आहेत. तरीही त्यांनी एपीके फाईल पाठवून मला क्लिक करण्यासाठी त्यांनी आग्रह केला होता. मात्र, मी एपलचा फोन वापरत असल्याने ती फाईल क्लिक होतच नव्हती. त्यावेळी, संबंधितांनी मला तुमचा फोन कुठला आहे, तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत नाही का? अँड्रॉईड फोनवरुन लिंक क्लिक करा, असा मेसेज मला केल्यानंतर मी सावध झाले, असेही ऐश्वर्या नारकर यांनी सांगितले.

चिन्मय मांडलेकरच्या पत्नीसोबतही असाच प्रकार

अभिनेता चिन्मय मांडलेकरनं सोशल मीडियावर पोस्ट करुन सांगितलं की, एक दिवस त्याला गॅस कनेक्शन बिल भरलं नसल्याचा मेसेज आला. त्यानं पोस्टमध्ये फोनची व्हॉइस रेकॉर्डींगही ऐकवलीय. त्यात फोन करणारी व्यक्ती म्हणतेय की, जानेवारी महिन्याचं 1068 रुपये बिल भरलेलं नाही. तुमचं बिल अपडेट दिसत नाही. व्हॉटस् अॅपला पाठवलेली फाइल डाऊनलोड करा. जर वेळेत पैसे भरले नाही तर पुढच्या 30 मिनिटांत आमची माणसं येऊन तुमचं कनेक्शन कट करतील, असं सांगितलं. पण, जागरुक असल्यामुळे हा फोन म्हणजे, स्कॅमचा प्रकार असल्याचं चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या लक्षात आलं. त्यामुळे तिनं फोन न ठेवता त्याच्याशी बोलायला सुरुवात केली.

हेही वाचा

'पैसे भरा नाहीतर...', प्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरला फ्रॉड कॉल; माणसं घरी पाठवू असं म्हणत थेट धमकी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding: सुनेपेक्षा सासू वरचढ, अंजली तेंडुलकरांच्या 'रॉयल लूक'नं वेधलं लक्ष; फिका पडला नववधूचा मॉर्डन अंदाज PHOTOs
सुनेपेक्षा सासू वरचढ, अंजली तेंडुलकरांच्या 'रॉयल लूक'नं वेधलं लक्ष; फिका पडला नववधूचा मॉर्डन अंदाज PHOTOs
Ashok Hande Beaten Up Over Parking Issue: 'मराठी बाणा' फेम अशोक हांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; पार्किंगचा वाद विकोपाला, आरोपीची ऑफिसमध्ये घुसून बॅटनं मारहाण
'मराठी बाणा' फेम अशोक हांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; पार्किंगचा वाद विकोपाला, आरोपीची ऑफिसमध्ये घुसून बॅटनं मारहाण
Bollywood Actress on Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
Thalapathy Vijay Divorce: सुपरस्टार विजय थलपतीकडून बायकोला 250 कोटींच्या पोटगीची ऑफर? अभिनेत्रीसोबतच विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप
सुपरस्टार विजय थलपतीकडून बायकोला 250 कोटींच्या पोटगीची ऑफर? अभिनेत्रीसोबतच विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Putin on Gas to European Markets: इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
Donald Trump War with Iran: ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
Bollywood Actress on Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
Maharashtra Farmer Loan Waiver मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
Maharashtra Breaking LIVE Updates: स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार द्या, सुधीर मुनगंटीवारांची मागणी
Maharashtra Breaking LIVE Updates: स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार द्या, सुधीर मुनगंटीवारांची मागणी
Nagpur Crime News: चिमुकल्याने अंगावर रंग उडवला, आजी संतापली, नातवाच्या अंगावर कडकडीत गरम पाण्याची बादली उपडी केली, नागपूरमधील धक्कादायक घटना
चिमुकल्याने अंगावर रंग उडवला, आजी संतापली, नातवाच्या अंगावर कडकडीत गरम पाण्याची बादली उपडी केली, नागपूरमधील धक्कादायक घटना
Embed widget