ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
Improve Bone Strength Naturally with These Calcium-Rich Foods: चुकीच्या आहारामुळे तरुणांमध्ये हाडांचे आजार वाढत असल्याची माहिती आहे. कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी हाडांसाठी अत्यंत आवश्यक.

Best Foods to Strengthen Bones: पोषणची कमतरता आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे हाडांची समस्या वाढतात. जी मुले आणि तरुणांना प्रभावित करते. जर आपल्याला कमी वयात हाडे कमकुवत आणि हाडांचा त्रास सतावत असेल तर, वेळीच याकडे लक्ष द्या. तुमची हाडे अकाली वृद्ध होऊ नयेत आणि हाडांचे दुखणे, कमकुवतपणा किंवा ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्यांना तोंड द्यायचे नसेल, तर तुम्ही आजपासून तुमच्या आहारात बदल करायला हवेत. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध असलेले पदार्थ खायला सुरुवात करा. हे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच उत्तम आरोग्य राखण्यासही मदत करतात.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
दूध, दही, चीज आणि ताक हे कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत. मजबूत हाडे राखण्यासाठी आणि उंची वाढवण्यासाठी दुधाचे महत्त्व तुम्ही ऐकले असेल. दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ आयुष्यभर तुमच्या हाडांचे रक्षण करण्यासही मदत करतात. दुधाचे पदार्थ केवळ हाडे मजबूत करत नाहीत तर दंत आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. त्यामध्ये व्हिटॅमिन के देखील मुबलक प्रमाणात असते, जे कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतात. आपण आहारात पालक आणि ब्रोकोलीचा समावेश करू शकता. उत्तम आरोग्य आणि शरीर मजबूत ठेवण्यासाठी पालेभाज्या मदत करते.
तीळ आणि बदाम
तीळ हे कॅल्शियमचे एक शक्तिशाली केंद्र आहे. म्हणून लहान मुले, तरुण, वृद्ध आणि महिला सर्वांनी त्यांचे सेवन करायला हवे. बदाम आणि अक्रोडमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस देखील असते. जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. नियमित ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. तसेच त्यांची लवचिकता वाढते.
रागी
रागी भारतात पिकवले जाणारे धान्य आहे. रागी कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहे. रागीमध्ये गहू किंवा तांदळापेक्षा अनेक पट जास्त कॅल्शियम असते. रागीच्या पिठाची भाकरी किंवा दलिया खाल्ल्याने ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो. त्यामुळे मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी रागीचे पदार्थ खावे.
संत्री
व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत म्हणजे संत्री. ताज्या संत्र्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. नियमित ताज्या संत्र्याचा रस प्याल्याने शरीराला कॅल्शियम, व्हिटॅमिन डी मिळते. यामुळे हाडं मजबूत होतात. तसेच ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांचाही धोका कमी होतो. त्यामुळे आपल्या आहारात संत्री या फळाचा नक्कीच समावेश करा.























