(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एक आवळा, अनेक फायदे! शरीरासाठी जबरदस्त फायदेशीर आवळ्याचे महत्व जाणून घ्या...
Amla juice weight loss : आवळा आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. आयुर्वेदातही आवळ्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.
Amla juice weight loss : आवळा आपल्या आंबट आणि तुरट चवीसाठी ओळखला जातो. आवळा आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. आयुर्वेदातही आवळ्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकजण आवळा पाहिला की नाकतोंड मुरडतात. पण आवळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्यामुळे आवळा खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्व असतात.
त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीएजिंग गुणधर्म असतात. तसेच आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते. अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचं सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. आवळा केस, त्वचा आणि पोटासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
वजन कमी करण्याव्यतिरिक्त आवळा पोषक तत्व आणि अॅन्टीऑक्सिडंटने परिपूर्ण असतो, त्यामुळे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो. आवळा ताप, घशातील खवखव किंवा समस्या, ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी, फुफ्फुसांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतो, तसेच वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठीही आवळा मदत करतो.
त्वचेसाठीही आवळा गुणकारी ठरतो. आवळा एक नैसर्गिक हेअर कंडिशनरच्या रूपातही काम करतो. आवळा फॅटी लिव्हर आणि कोलेस्ट्रॉलशी लढून शरीराचं वजन कमी करण्यासाठी लाभदायक असतो. जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर आवळ्याचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं.
आवळा हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतो. आवळा शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करून चांगलं कोलेस्ट्रॉल तयार करण्याचं काम करतो. जर पोटात होणाऱ्या समस्या जसं, जळजळ, गॅस यांसारख्या समस्याही दूर करतो. त्यामुळे दिवसातून दोन वेळा आवळ्याचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. आवळा डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठीही मदत करतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- मिठाचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या कोणत्या लोकांनी मीठ कमी खावे...
- Health Tips : मासिक पाळी दरम्यान होणारी पोटदुखी होईल कमी; ट्राय करा हे घरगुती उपाय
- Health Tips : उन्हाळ्यात 'ही' फळे खाऊन वजन करा कमी, डाएटिंगची गरज भासणार नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )